किसान सभेचा चांदवड प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 07:18 PM2021-08-03T19:18:00+5:302021-08-03T19:19:08+5:30
चांदवड : येथील चांदवड तालुका किसान सभा, सी. आय. टी. यु. जनवादी महिला संघटना, शेतमजुर संघटना, डी. वाय. एफ. आय. आदी संघटनाच्या वतीने विविध मागण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येवून प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
चांदवड : येथील चांदवड तालुका किसान सभा, सी. आय. टी. यु. जनवादी महिला संघटना, शेतमजुर संघटना, डी. वाय. एफ. आय. आदी संघटनाच्या वतीने विविध मागण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येवून प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
कृषी उत्पन्न बाजार समितीपासून काढण्यात आलेला मार्चा बसस्थानक, बाजारतळ, सोमवारपेठ, शिवाजीचौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गे प्रांत कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व हनुमंत गुंजाळ, तुकाराम गावीत, शब्बीर सैय्यद, सरिका गुंजाळ यांनी केले. यावेळी राजाराम ठाकरे, भाऊसाहेब मोरे, गणपत गुंजाळ, ताई पवार, नामदेव पवार, देवाजी कुवर, नंदाबाई मोरे, सुरेश चौधरी, रुपचंद ठाकरे आदी मोर्चात सामील झाले होते.
मोर्चा शांततेत संपन्न झाला. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल सणस, राज्य राखीव दलांचे पोली व चांदवड पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
चांदवड- देवळा तालुक्यातील वनअधिकार कायद्याची काटेकोरपणो अंमलबजावणी झाली पाहीजे, चांदवड -देवळा तालुक्यातील वनजमिनीचे ज्यांना प्रमाणपत्र मिळाले आहेत. ताब्यात असलेली संपुर्ण जमीन मोजुन सातबाराला लावण्यात यावी. उपविभागीय अधिकाऱ्यांकडून सन २०१५ पासून आजर्पयत जमा केलेल्या फाईलची नावासह यादी मिळावी, जातीचे दाखले शाळेतील मुलांसाठी कॅम्प लावून देण्यात यावे, ज्या लोकांच्या ताब्यात वनजमिनी नाहीत अशा लोकांचे बोगस प्रमाणपत्र तयार झालेले आहेत. तलाठी यांनी त्यांचे पहाणी न करता सात बारा तयार करुन दिलेले आहेत. तरी ते त्वरीत चौकशी करुन सातबारा रद्द करण्यात यावा अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.