येवल्यात किसान सभेचा प्रांत कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 10:01 PM2020-09-24T22:01:02+5:302020-09-25T01:20:38+5:30
येवला : कष्टकरी, श्रमीकांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने माजी आमदार जे. पी. गावीत यांचे नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोदी सरकारच्या श्रमीक विरोधी व भांडवलदार धार्जिण्या धोरणांचा निषेध करत विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी सोपान कासार यांना देण्यात आले.

वनाधिकार कायद्यानुसार पात्र दावेदारांच्या ताब्यातील वनजमीनींचे सातबारा त्यांचे नावे करून द्या, प्रलंबीत वनदावे विनाअट मंजूर करा, पिढ्यानिपढ्या वनजमीनी कसणार्यांच्या जमीनीत वनविभागाने कामे करू नये, आदीवासी कष्टकर्यांच्या शिधा पत्रिकांचा प्रश्न तात्काळ सोडवावा, आदीवासी कष्टकर्यांच्या प्रत्येक कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ द्या, स्थलांतर थांबवण्यासाठी गावातच रोहयो अंर्तगत काम उपलब्ध करून द्या, कोराना काळातील सर्व शासकीय कर वा वसुली माफ करण्यात यावी, आदी मागण्या सदर निवेदनात करण्यात आल्या आहेत.निवेदनावर सावळीराम पवार, इरफान शेख, सुनील मालुसरे, सुभाष चौधरी, हनुमंत माळी, शांताराम दळवी, उखा माळी, त्र्यंबक ठाकरे, गणपत गुंजाळ, डॉ. रामराव पारधे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.