नगर परिषद कर्मचाऱ्यांचा आयुक्त कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:36 AM2018-07-17T00:36:52+5:302018-07-17T00:37:12+5:30
राज्यातील नगर परिषद कर्मचा-यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट नगरपालिका कामगार-कर्मचारी संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
नाशिकरोड : राज्यातील नगर परिषद कर्मचा-यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट नगरपालिका कामगार-कर्मचारी संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. महाराष्टÑ नगरपालिका कामगार-कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी दुपारी रेल्वेस्थानक आंबेडकर पुतळा येथून आपल्या विविध मागण्यांसाठी भरपावसात घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालयावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. उपायुक्त रघुनाथ गावंडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर परिषद कर्मचाºयांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. १० मार्च १९९३च्या पूर्वी सेवेत घेतलेल्या कर्मचाºयास वारसा हक्क व अनुकंपा योजना लागू करावी तसेच या कर्मचाºयांची मागील सेवा पेन्शन पात्र सेवा धरावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मोर्चामध्ये सीताराम ठोंबरे, देवीदास आडोळे, पोपटराव सोनवणे, रामदास पगारे, रघुनाथ बैसाणे, हिरामण तेलोरे, अशोक लहाने, सदाशिव शेळके, कैलास आहिरे, सुधाकर आहेर, देवीदास बोंदार्डे, सुभाष पाटील, सुरेश आहिरे सहभागी झाले होते.
मागण्यांचे निवेदन
रोजंदारी, कंत्राटी, हंगामी कर्मचारी यांना विनाअट कायम करण्यात यावे तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना समान कामाला समान वेतन लागू करावे, चतुर्थ श्रेणीतील सफाई कर्मचाºयांप्रमाणे शिपाई, वॉचमन, कामाठी, कुली यांच्या वारसांना पूर्वीप्रमाणे विशेष बाब या योजनेखाली नोकरीमध्ये सामावून घ्यावे,आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.