पांगरीत शेतकरी संघटनेचा वीज कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 10:50 PM2022-01-20T22:50:29+5:302022-01-20T22:51:05+5:30

पांगरी : यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसून विहिरीला असलेल्या पाण्यावर रब्बीची पिके आली आहेत. महावितरण कंपनीने वसुली होत नसल्याने पांगरी परिसरातील थकबाकीदारांचे रोहित्रे बंद करून वसुली सुरू केली असल्याने हाती आलेले पीक वाया जाते की काय, अशी भीती निर्माण झाल्याने पांगरी येथील शेतकरी संघटनेने वावी येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक हिरावून घेऊ नका, अशी मागणी करीत पांगरी येथील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वावी सहायक अभियंता यांना निवेदन दिले.

Morcha of Pangrit Farmers Association at the power office | पांगरीत शेतकरी संघटनेचा वीज कार्यालयावर मोर्चा

खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदन देताना शेतकरी संघटना कार्यकर्ते व उपस्थित शेतकरी.

Next
ठळक मुद्देनिवेदन : वीज कनेक्शन तोडू नका, अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा

पांगरी : यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसून विहिरीला असलेल्या पाण्यावर रब्बीची पिके आली आहेत. महावितरण कंपनीने वसुली होत नसल्याने पांगरी परिसरातील थकबाकीदारांचे रोहित्रे बंद करून वसुली सुरू केली असल्याने हाती आलेले पीक वाया जाते की काय, अशी भीती निर्माण झाल्याने पांगरी येथील शेतकरी संघटनेने वावी येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक हिरावून घेऊ नका, अशी मागणी करीत पांगरी येथील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वावी सहायक अभियंता यांना निवेदन दिले.
महावितरण कंपनीने थकबाकी वसुली होत नसल्याने पांगरी परिसरातील थकबाकीदारांचे रोहित्रे बंद करून बिल वसुली करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे जोमात आलेली पिके पाण्याअभावी जळून जाण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे येथील संतप्त शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनेने महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला व तत्काळ वीजपुरवठा जोडणी करून द्यावी, अन्यथा येथील शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा निवेदानाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आत्माराम पगार, कृष्णा घुमरे, बारकू पगार, बाबासाहेब पांगारकर, रामदास पगार, गणेश डुकरे, रामदास डुकरे, बाबासाहेब कलकत्ते, आनंदा वारुळे, सोमनाथ पांगारकर, जगन्नाथ पगार, किसन वारुळे, पुंजाहरी पगार, बबन डुकरे, सुभाष डुकरे आदींसह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वीज वितरण कंपनीने दरवर्षी पाच हजार रुपये वीजबिल वसुली करावी तसेच महावितरण कंपनीने मागील दहा वर्षांपूर्वी जे शेतकऱ्यांना अनाठायी वीजबिल दिले आहेत ते कमी करावे.
- आत्माराम पगार, तालुका अध्यक्ष, शेतकरी संघटना
 
Web Title: Morcha of Pangrit Farmers Association at the power office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.