हाथरस घटनेच्या निषेधार्थ मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 11:32 PM2020-10-04T23:32:00+5:302020-10-05T00:52:54+5:30
नाशिक: उत्तरप्रदेशातील चंदपा, हाथरस व बलरामपूर येथील युवतींवर घडलेल्या बलात्कार निर्घृण खुनाच्या घटनांच्या निषेधार्थ छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे 'आम्ही नाशिककर ' बॅनर खाली रविवारी (दि.४) आक्रोश मोर्चा काढत उत्तरप्रदेश पोलीस व सरकार विरोधात निषेध निषेध नोंदविण्यात आला.
नाशिक: उत्तरप्रदेशातील चंदपा, हाथरस व बलरामपूर येथील युवतींवर घडलेल्या बलात्कार निर्घृण खुनाच्या घटनांच्या निषेधार्थ छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे 'आम्ही नाशिककर ' बॅनर खाली रविवारी (दि.४) आक्रोश मोर्चा काढत उत्तरप्रदेश पोलीस व सरकार विरोधात निषेध निषेध नोंदविण्यात आला.
वडाळा नाका परिसरातील महर्षी वाल्मिकी मंदिर येथून सुरु झालेल्या या मोर्चाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून समारोप करण्यात आला. तत्पूर्वी हाथरस येथील पिडितेला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी या मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून हाथरस येथील सामुहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषींवर कडक कलमे लावण्याची मागणी करतानाच असे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टासमोर चालवून आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. त्याचप्रमाणे हाथरस पोलिसांनी केलेली कारवाई, तपास आणि कृती ही आरोपींपेक्षाही गंभीर आणि भयावह असल्याचे नमूद करतानाच पिडितेच्या
अंत्यविधीची कृती समाजाचे मनोधैर्य खरच्चीकरण व भयभीत करणारी आणि पोलिस यंत्रणेवरची विश्वासार्हता गमावणारी असल्याने मुख्य आरोपींसोबतच तपास अधिकाऱ्यांना सहआरोपी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आंदोलकांचे निवेदन शासनाच्या शिफारसींसह राष्ट्रपतींना पाठवावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या मोर्चात राष्ट्रवादी विध्यार्थी काँगेसचे जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे, छात्रभारतीचे राकेश पवार, अॅड. शरद कोकाटे, प्रिया ठाकूर, निशिकांत पगारे, सुरेश मारू, रणमाळे, सचिन भुसारे, निखील गुंजाळ, रोशन वाघ, राम सूर्यवंशी, देविदास हजारे, समाधान बागुल भूषण बोरसे स्वाती त्रिभुवन हरीश पवार सनी बंदावणे गोकुळ मेदगे हरीश दलोड जयंत विजयपुष्प आदी सहभागी झाले होते.
नारी सन्मान मे नाशिककर मैदान मे
हाथरस घटनेच्या निषेधार्थ नाशिककरांनी काढलेल्या मोर्चात सहभागी आंदोलकांनी 'नारी के सम्मान में,हम है मैदान मे', 'नो मोर रेप्स', 'रेप इज नॉट सेक्स, इट इज व्होईलन्स', बेटी दिल मे,बेटी वील मे' अशा घोषणांचे फलक उंचावून नागरिकांचे लक्ष वेधून घेत हाथरस घटनेचे गांभीर्य नागरिकांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला.