मनमाडला रिपाईच्या वतीने मोर्चा, रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:03 PM2018-12-10T23:03:44+5:302018-12-10T23:04:34+5:30
मनमाड : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यावर भ्याड हल्ला करण्याच्या घटनेचे पडसाद मनमाड शहरात उमटले. या घटनेचा निषेध करण्यासाठी रिपाई शहर शाखेच्या वतीने आज शहरातून मोर्चा काढून इंदूर पुणे महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तसेच शहरात कडकडीत बंद पाळण्यात आल्याने दैनंदीन व्यवहार ठप्प झाले होते.
मनमाड : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यावर भ्याड हल्ला करण्याच्या घटनेचे पडसाद मनमाड शहरात उमटले. या घटनेचा निषेध करण्यासाठी रिपाई शहर शाखेच्या वतीने आज शहरातून मोर्चा काढून इंदूर पुणे महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तसेच शहरात कडकडीत बंद पाळण्यात आल्याने दैनंदीन व्यवहार ठप्प झाले होते.
रिपाई शाखेच्या वतीने शहराच्या प्रमुख मार्गावरून मोर्चा काढून या घटनेचा निषेध करण्यात आला. रामदास आठवले आगे बढो च्या घोषणांनी परिसर दणानून गेला होता.हातात निळे ध्वज व निषेधाच्या घोषणा देत हा मोर्चा शहरातून जाणाऱ्या पुणे इंदूर महार्मावर येउन पोहचला. या ठिकाणी संतप्त कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन केले.या मुळे महामार्गाच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वहातूक ठप्प झाली होती. असे भ्याड कृत्य करणाºया माथेफिरूवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच आठवले यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात यावी अशी मागणी संतप्त कार्यकर्त्यांनी मंडल अधिकारी कैलास चौधरी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद मुळे दुकाने,खाजगी अस्थापना बंद असल्याने शहराच्या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट जानवत होता.सर्वत्र बंद असल्याने नागरिकांची गौरसोय झाली. शहरातील व्यापारी व नागरिकांनी या बंदमधे सहभाग घेउन बंद यशस्वी केला.रिपाई शहर शाखेकडून करण्यात आलेल्या या आंदोलनाला शिवसेना, स्वाभिमानी रिपब्लीकन पक्ष, फुले शाहू आंबेडकर मुलनिवासी विचार मंच यांच्यासह अन्य पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला होता.या वेळी रिपाईचे जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाउ अहिरे, गंगाभाउ त्रिभुवन, अनिल निरभवणे,दिनकर धिवर, कैलास अहिरे, दिलीप नरवडे, पी.आर. निळे, मोजेस साळवे,सुरेश श्ािंदे, गुरूकुमार निकाळे, प्रविण पगारे, रुक्मीणी अहिरे, कमल खरात,मंदा भोसले,पुष्पा गायकवाड, अरुणा जाधव,सुशिला धिवर, सुशिला राउत,नुतन गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.रिपाई युवा शाखेचे रेल्वे स्थानकावर निदर्शने...रिपाई युवा शाखेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी करत रेल्वे स्थानक गाठले. येथील फलाट क्रमांक तीन वर घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.आठवले यांना धक्काबुक्की करण्याच्या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र युवक आघाडीचे वंदेश गांगुर्डे, अनिल संसारे, सोनू बागूल, रमेश जाधव,प्रविण जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.