दीडशेहून अधिक हेक्टरला सिंचनाचा होणार फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:13 AM2021-03-07T04:13:45+5:302021-03-07T04:13:45+5:30

सिन्नर: मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत सिन्नर तालुक्यातील चार गावांतील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीस जलसंधारण विभागाने मंजुरी दिली आहे. ...

More than 150 hectares will benefit from irrigation | दीडशेहून अधिक हेक्टरला सिंचनाचा होणार फायदा

दीडशेहून अधिक हेक्टरला सिंचनाचा होणार फायदा

Next

सिन्नर: मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत सिन्नर तालुक्यातील चार गावांतील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीस जलसंधारण विभागाने मंजुरी दिली आहे. या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे चार गावांतील दीडशेहून अधिक हेक्टरला सिंचनाचा फायदा होणार आहे.

सिन्नर तालुक्यातील शहा, वडांगळी, खडांगळी व खोपडी बुद्रुक येथील गावतलाव व बंधाऱ्यांची गळती मोठ्या प्रमाणावर होत होती. ही गोष्ट संबंधित गावातील शेतकऱ्यांनी आ. माणिकराव कोकाटे यांच्याकडे मांडून बंधाऱ्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जलसंधारण विभाग नाशिक यांनी सदर बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर केले होते. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या प्रस्तावांना नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या चारही गावांतील सिंचनात वाढ होणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पीकपद्धतीतही बदल होणार आहे. शहा येथील बंधाऱ्यास २२ लाख ५९ हजार, वडांगळी येथील बंधाऱ्यास २७ लाख २६ हजार रुपये, खडांगळी येथील बंधाऱ्यास २२ लाख ६५ हजार रुपये तर खोपडी बुद्रुक येथील बंधाऱ्यास १९ लाख ४५ हजार रुपये इतका निधी दुरुस्तीस मंजूर झाला आहे. कामाच्या निविदा तात्काळ काढून लवकरात लवकर कामे सुरू करण्याचे आदेश आ. कोकाटे यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

-------------------

सिंचनक्षेत्रात वाढ होणार...

वडांगळी येथील कासार नाल्यावरील बंधारा गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. मात्र, वेळेवर दुरुस्ती होत नसल्याने या बंधाऱ्यातील पाणी वाहून जात होते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात येथील शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असे. या परिसरातील शेतकऱ्यांनी माजी उपसरपंच नानासाहेब खुळे यांच्यामार्फत आ. कोकाटे यांच्याकडे बंधारा दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला होता. तो मंजूर झाल्याने शेतकऱ्यांचे सिंचनक्षेत्र वाढणार आहे.

सुदेश खुळे, अध्यक्ष, ग्रीन व्हिजन फार्मर्स कंपनी

Web Title: More than 150 hectares will benefit from irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.