२ हजारांहून अधिक कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 11:52 PM2020-06-28T23:52:59+5:302020-06-28T23:58:57+5:30

नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोनाशी यशस्वी लढा देऊन त्याला पराभूत करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आतापर्यंत २ हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे.

More than 2,000 corona free | २ हजारांहून अधिक कोरोनामुक्त

२ हजारांहून अधिक कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्देशुभवर्तमान : बरे होणाऱ्यांचे प्रमाण मोठे

नाशिक : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोनाशी यशस्वी लढा देऊन त्याला पराभूत करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आतापर्यंत २ हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे.
जिल्हा सामान्य रु ग्णालयामार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जिल्ह्यातील २ हजार ४३ कोरोना बाधीत रोग मुक्त झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. असे असले तरी जिल्ह्यात सध्या १ हजार ५१५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत २१५ रु ग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
जिल्ह्यात नाशिक महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ९२ कोरोना बाधितांचे मृत्यू झाले असून, मालेगाव महापालिका क्षेत्रात ७३ बळी गेले आहेत. याशिवाय नाशिक ग्रामीणमध्ये ३९ व जिल्ह्याबाहेरील ११ अशा एकूण २१५ रु ग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
दीड हजारांहून अधिक रुग्ण
जिल्ह्यामध्ये सध्या १ हजार ५१५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. यामध्ये नाशिक तालुक्यात ६५, चांदवडला ८, सिन्नरला ३९, दिंडोरीत १७, निफाडला ४८, नांदगांवमध्ये १३, येवल्याला ३८, त्र्यंबकेश्वरमध्ये १०, बागलाणला ८, इगतपुरीत २५ तर मालेगांव ग्रामीणमध्ये १२ असे रुग्ण आहेत. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ४१ तर मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १५१ व जिल्ह्याबाहेरील ४० असे एकूण १ हजार ५१५ रु ग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ३ हजार ७७३ रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: More than 2,000 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.