२५ टक्क्यांहून अधिक जागा रिक्त राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 01:24 AM2019-08-19T01:24:06+5:302019-08-19T01:24:32+5:30
अकरावी प्रवेशाच्या तीन नियमित फेºया पूर्ण झाल्यानंतर विशेष गुणवत्ता फेरी राबविण्यात येत असून, या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतरही शहरातील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या सुमारे २५ ते ३० टक्के जागा म्हणजेच जवळपास आठ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता दिसून येत आहे.
नाशिक : अकरावी प्रवेशाच्या तीन नियमित फेºया पूर्ण झाल्यानंतर विशेष गुणवत्ता फेरी राबविण्यात येत असून, या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतरही शहरातील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या सुमारे २५ ते ३० टक्के जागा म्हणजेच जवळपास आठ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता दिसून येत आहे.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात अकरावीच्या २३ हजार ८६० जागा असून, आत्तापर्यंत २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असली तरी बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रथम पसंतीचे महाविद्यालय निवडल्याने अन्य जागा रिक्त राहिल्या आहेत.
शहरातील सुमारे २३ हजार ८६० जागांपैकी केवळ साडेतेरा हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, विशेष फेरीत ४ हजार १०७ विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली असली तरी यातील २ ते अडीच हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील विविध महाविद्यालयांधील सुमारे आठ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी नाशिक शहरात मुंबई, पुण्याच्या धर्तीवर आॅनलाइन प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार तीन नियमित फेºया राबविण्यात आल्यानंतर चौथ्या फेरीची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. विशेष फेरीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १९ आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी आयटीआय, पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला पसंती दिल्याने या फेरीनंतरही शहरात अकरावीच्या आठ हजारांहून अधिक जागा रिक्तराहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अजूनही संधी : प्रथम प्राधान्य मिळणार
विशेष फेरीच्या गुणवत्ता यादीत नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा कटआॅफ सर्वाधिक ८४ टक्के लागला. याच महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा कटआॅफ ९०.२० टक्के लागला. पहिल्या तीनफेऱ्यांच्या तुलनेत इतर महाविद्यालयांचे कटआॅफ खाली आले आहे. त्यामुळे आता अकरावी प्रवेशासाठी प्रथम तीनफेºयांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी विशेष फेरीत अन्य महाविद्यालयांचे पर्याय निवडल्याचे दिसून येत असून, या यादीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १९ आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य दिले असणार नामांकित महाविद्यालयांमधील रिक्त जागांवर प्रवेशासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना अजूनही संधी उपलब्ध होणार आहे.