मास्क न वापरणाऱ्या ५० हून अधिक सिडकोवासियांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:14 AM2021-03-20T04:14:31+5:302021-03-20T04:14:31+5:30
सिडको : सिडको व अंबड भागात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतानाही व्यावसायिक तसेच नागरिक कोणत्याही प्रकारचे ...
सिडको : सिडको व अंबड भागात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतानाही व्यावसायिक तसेच नागरिक कोणत्याही प्रकारचे नियम पाळत नसल्याने शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी अंबड पोलीस व महापालिका यांच्यातर्फे संयुक्तक्तरीत्या मोहीम राबवत मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. मास्क सक्तीच्या अंमलबजावणीसाठी शुक्रवारी पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव , श्रीकांत निंबाळकर , सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय बेडवाल तसेच मनपा विभागीय अधिकारी मयुर पाटील , आरोग्य अधिकारी संजय गांगुर्डे ,तसेच मनपा कर्मचारी व पोलीस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथून मोहिमेस सुरुवात करण्यात आल्यानंतर सावता नगर, पवन नगर ,तोरणा नगरमार्गे ही संचलन करीत पोलीस व महापालिका प्रशासनाने मास्क विषयी जनजागृती करतानाच मास्क न वापरणाऱ्या सुमारे ५० हून अधिक नागरिकांवर दंडात्मक कारवाईही केली. तसेच हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या नागरिकांकडे प्लास्टिक कॅरीबॅग आढळल्याने त्यांच्यावरही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. या मोहीमेमुळे परिसरात नागरिकांसह व्यावसायिंकामध्ये चांगलीच धावपळ उडाली होती. दरम्यान, या मोहीमेच्या माध्यमातून पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून संयुक्तरीत्या नागरिकांना मास्क वापरण्याचे तसेच फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करण्यात आले.
===Photopath===
190321\19nsk_34_19032021_13.jpg
===Caption===
सिडको परिसरात मास्कसक्तीच्या अंमलबजावणीसाठी मनपा व पोलीस प्रशासनातर्फे संयुक्त मोहीम राबविताना पोलीस उपायुक्त विजय खरात, अशोक नखाते, कमलाकर जाधव, श्रीकांत निंबाळकर, संजय बेडवाल मयुर पाटील, संजय गांगुर्डे आदी.