तुळजा भवानी चौकात पन्नासहून अधिक डेंग्यूसदृश रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:33 AM2017-10-28T00:33:06+5:302017-10-28T00:33:12+5:30
गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र डेग्यूसदृश रुग्ण संख्येत वाढ झालेली असतानाच सिडकोतील तुळजा भवानी चौक परिसरात एकाच भागात सुमारे पन्नासहून अधिक डेंग्यूसदृश रुग्ण आढळले असल्याने खळबळ उडाली आहे. सिडको भागात रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाही मनपाचा संबंधित विभागाकडून मात्र योग्य नियोजन करण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सिडको : गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र डेग्यूसदृश रुग्ण संख्येत वाढ झालेली असतानाच सिडकोतील तुळजा भवानी चौक परिसरात एकाच भागात सुमारे पन्नासहून अधिक डेंग्यूसदृश रुग्ण आढळले असल्याने खळबळ उडाली आहे. सिडको भागात रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाही मनपाचा संबंधित विभागाकडून मात्र योग्य नियोजन करण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज शिवसेना नगरसेवक कल्पना पांडे यांनी परिसरात पाहणी करीत यास मनपाचा मलेरिया विभागच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. सिडको विभागात सर्वसामान्य नागरिक वास्तव करीत असून, गेल्या काही दिवसांपासून सिडको परिसरात डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. दीपावली सणानंतर सिडको भागातील मोकळे मैदान व रस्त्याच्या कडेला ठिक ठिकाणी घाण व कचºयाचे ढीग साचले असून, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अस्वच्छतेमुळे सिडको भागात मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले. तूळजा भावानी चौक या परिसरातच पन्नासहून अधिक रुग्ण असून, यात दिवसेंदिवस वाढ होत असतानाही याकडे मनपाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. डेंग्यू या आजाराबरोबर साथीच्या आजाराची लागण होऊ नये यासाठी मनपाच्या मलेरिया विभागाकडून कोणतीही दखल घेत जात नसून परिसरात नियमित फवारणीदेखील केली जात नाही. सिडकोतील तुळजा भवानी चौकातील उद्यानाची दयनीय अवस्था झाली आहे. तसेच उद्यानात गाजरगवत वाढलेले असून, याठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाकीतदेखील अनेक दिवसांपासून पाणी साचलेले असल्याचे दिसून आले. याबाबत आज नगरसेवक कल्पना पांडे व माजी नगरसेवक चंद्रकांत पांडे यांनी संपूर्ण तुळजा भवानी परिसरात पाहणी करून डेग्यूसदृशरुग्णांचीदेखील घरोघरी जाऊन पाहणी केली. तसेच यावेळी मलेरिया विभागाच्या कर्मचाºयांना-देखील तातडीने बोलावून याठिंकाणी फवारणी करण्यात आली.
मनपाचा मलेरिया विभाग नावापुरताच
महापालिकेच्या वतीने सिडको भागात पेस्टकंट्रोलचा औषध फवारणी ठेक्यासाठी लाखो रुपये खर्च केला जातो, परंतु ठेकेदाराकडून याबाबत कोणतीही दखल घेतली जात नसून त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळणाºया या ठेकेदाराचा ठेका त्वरित रद्द करून त्यास काळ्या यादीत टाकावे यासाठी मनपा आयुक्तांची भेट घेणार. - कल्पना पांडे, नगरेसवक