नाशिकमध्ये पंधराशेहून अधिक प्राध्यपकांचे काम बंद आंदोलन ; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 03:40 PM2018-09-25T15:40:39+5:302018-09-25T15:44:53+5:30

महाराष्ट्रातील प्राध्यापकांच्या बारा हजार रिक्त जागा त्वरित भराव्यात, आंदोलन काळातील २०१३ पासून ७१ दिवसांच्या पगाराची भरपाई मिळावी यासह समान काम समान वेतन अशा विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयीन प्राध्यापकांनी मंगळवारी (दि.२५)विविध महाविद्यालयांसमोर एकत्र येऊन कामबंद आंदोलन केले. 

More than 500 professors stop movement in Nashik; Educational damages of students | नाशिकमध्ये पंधराशेहून अधिक प्राध्यपकांचे काम बंद आंदोलन ; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

नाशिकमध्ये पंधराशेहून अधिक प्राध्यपकांचे काम बंद आंदोलन ; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

Next
ठळक मुद्देनाशिकमध्ये प्राध्यपकांचे काम बंद आंदोलनपंधराशेहून अधिक प्राध्यपकांचा आंदोलनात सहभाग आरवायके, एचपीटीचे प्राध्यापक संपातून बाहेर

नाशिक : महाराष्ट्रातील प्राध्यापकांच्या बारा हजार रिक्त जागा त्वरित भराव्यात, आंदोलन काळातील २०१३ पासून ७१ दिवसांच्या पगाराची भरपाई मिळावी यासह समान काम समान वेतन अशा विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयीनप्राध्यापकांनी मंगळवारी (दि.२५)विविध महाविद्यालयांसमोर एकत्र येऊन कामबंद आंदोलन केले. 
शहरातील केटीएचम, पंचवटी, के .व्ही. एन नाईक, भोसला महाविद्यालयांसग जिल्ह्यातील मालेगावची तीन वरिष्ठ महाविद्यालये देवळा, नामपूर, लासलगाव, चांदवड. वणी, सिन्नर, मनमाड, इगतपुरी अशा जिल्हाभरातील पंधराशेहून अधिक महाविद्यालयीन प्राध्यपकांनी या संपात मंगळवारपासून एमस्फुक्टो संघटनेने पुकारलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनात सक्रीय सहभाग सरकारविरोधात घोषणाबाजी केली. प्राध्यपकांच्या स्थानिक स्फुक्टो संघटनेतील सर्व प्राध्यापक सहभागी झाले असुन प्राध्यापकांनी पुकारलेल्या या संपाच्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने प्राध्यापक भरती वरील बंदी उठवावी, तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे वेतन वाढवावे, जुनी पेन्शन योजना राबवावी, सातवा वेतन आयोग लागू करावा अशा मागण्या असल्याचे सिनेट सदस्य तथा स्फुक्टोचे उपाध्यक्ष डॉ.नंदू पवार यांनी सांगितले. तर गोखले एज्युकेशन सोसायटीच्यी बी वाय के महाविद्यालयाव्यतिरिक्त कोणत्याही महाविद्यालयांचे प्राध्यापक या संपात सहभाही झाले नसल्याचे दिसून आले. संबधित प्राध्यपाक ांशी संवाद साधून त्यांनाही संपता सहभाही होण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने आंदलनापूर्वीच कामबंद करण्याचा इशारा दिलेला असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शिक्षण संस्थांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी कोणत्याही सूचना केलेल्या नाहीत. त्यामुळे प्राध्यापकांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, सप्टेंबरपर्यंत वरिष्ठ महाविद्यालयांच्या विविध विद्याशाखांचा पहिल्या सत्रातील अभ्यासक्रम पूर्ण झालेला असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नसल्याचा दावा काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी केला आहे. 

Web Title: More than 500 professors stop movement in Nashik; Educational damages of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.