विद्यार्थ्यांनी साकारल्या सहाशेहून अधिक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
By admin | Published: August 30, 2016 01:40 AM2016-08-30T01:40:39+5:302016-08-30T01:47:24+5:30
विद्यार्थ्यांनी साकारल्या सहाशेहून अधिक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
नाशिक : के. के. वाघ शिक्षण संस्था, स्मार्ट मॅनेजमेंट इंटरफेस लोकल एक्स्चेंज, स्पिनॅच सेंटर आॅफ एक्सलन्स यांच्या संयुक्त विद्यमाने के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर शाडूमातीपासून गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत तब्बल ६८० गणेशमूर्ती विद्यार्थ्यांकडून साकारण्यात आल्या होत्या.
कार्यशाळेच्या सुरुवातीला सचिव अजिंक्य वाघ यांनी कार्यशाळेची पार्श्वभूमी स्पष्ट करताना गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात होणारे जलप्रदूषण टाळण्याचे आवाहन केले. शाडूमातीपासून गणपतीच्या मूर्ती बनविल्याने निसर्गाचे संतुलन साधण्यास मदत होणार असल्याचेही वाघ यांनी यावेळी सांगितले. या कार्यशाळेदरम्यान के. के. वाघ फाइन आर्ट्स महाविद्यालयाचे अधिव्याख्याता बाळ नगरकर, प्राचार्य सचिन जाधव, प्रा. शैलेंद्र गौतम, प्रा. योगेश गटकळ, प्रा. संजय दुर्गावाड, प्रा. भूषण कोंबडे, प्रा. गोकुळ सूर्यवंशी, प्रा. प्रतिलाल भिल्ल यांनी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.
यावेळी के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, शकुंतला वाघ, विश्वस्त समीर वाघ, प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर, सचिव प्रा. के. एस. बंदी, अशोकराव वाघ, हेमंत वाघ, रवींद्र सातभाई, विजय भागवत, प्राचार्य पी. टी. कडवे, उपप्राचार्य भाऊसाहेब गवळी, व्ही. एम. सेवलीकर, प्राचार्य विद्या खपली आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)