८०हून अधिक अ‍ॅप साठविणारे ‘डीग मी अप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:44 AM2019-07-14T00:44:47+5:302019-07-14T00:45:28+5:30

सॉफ्टवेअर अभियंता होऊन जर्मनी, अमेरिका यांसारख्या देशांमध्ये उच्चशिक्षण घेतल्यानंतर मायदेशी परतणाऱ्या नाशिकच्या सोहम गरुड व देवयानी लाटे या दाम्पत्याने सोशल नेटवर्किंगमध्ये पाऊल टाकले आहे. ८०पेक्षा अधिक ग्राहक फ्रेन्डली अ‍ॅप्लिकेशनला एकाच ‘डीग मी अप’ नावाच्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये साठविण्याचा नवा पर्याय शोधला आहे.

More than 80 app stores 'dig me up' | ८०हून अधिक अ‍ॅप साठविणारे ‘डीग मी अप’

८०हून अधिक अ‍ॅप साठविणारे ‘डीग मी अप’

Next
ठळक मुद्देदोघांचे यश ; एकाच अ‍ॅप्लिकेशनमध्ये सर्वकाही

नाशिक : सॉफ्टवेअर अभियंता होऊन जर्मनी, अमेरिका यांसारख्या देशांमध्ये उच्चशिक्षण घेतल्यानंतर मायदेशी परतणाऱ्या नाशिकच्या सोहम गरुड व देवयानी लाटे या दाम्पत्याने सोशल नेटवर्किंगमध्ये पाऊल टाकले आहे. ८०पेक्षा अधिक ग्राहक फ्रेन्डली अ‍ॅप्लिकेशनला एकाच ‘डीग मी अप’ नावाच्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये साठविण्याचा नवा पर्याय शोधला आहे. ‘डीग मी अप’ या नव्या अ‍ॅप्लिकेशनच्या नावाचा अर्थ ‘मला शोधून काढा’ असा होतो. या अ‍ॅप्लिकेशनमध्ये एकापेक्षा अधिक अ‍ॅप्लिकेशन नेटवर्क जोडून सर्वच सोशल साइट्स वापरता येऊ शकतात, असा दावा सोहम व देवयानी यांनी पत्रकार परिषदेत केला.
स्मार्ट फोनच्या दुनियेत विविध प्रकारचे अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध झाले असून, अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप्लिकेशन स्मार्ट फोनमध्ये डाउनलोड करताना साठवणूक क्षमतेचा विचार करावा लागतो. त्यामुळे या युवा जोडीने त्याच्यावर तोडगा काढत आपले ज्ञान व कौशल्याच्या आधारे ‘डीग मी अप’ नावाचे एक स्वतंत्र अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. या अ‍ॅप्लिकेशनमध्ये ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, जी मेल, इन्स्टाग्राम यांसारखे आपल्याला हवे असलेले सुमारे ८० अ‍ॅप्लिकेशन सहजरीत्या जोडून ते वापरता येणे शक्य असल्याचा दावा सोहम व देवयानी यांनी यावेळी बोलताना केला. हे अ‍ॅप्लिकेशन प्ले-स्टोअरवरून अगदी मोफत डाउनलोड करता येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या नवीन माहिती तंत्रज्ञानातील शोधाबाबत ‘डीग मी अप’ नावाने आंतरराष्टÑीय पेटंट मिळविण्यासाठी अर्जही केल्याचे सोहमने सांगितले.

Web Title: More than 80 app stores 'dig me up'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.