नाशिकमध्ये 80 पेक्षा अधिक दुर्मिळ वृक्षांची लागवड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 03:56 PM2019-02-16T15:56:36+5:302019-02-16T15:58:16+5:30
महानगरपालिकेतर्फे पर्यावरण आणि जैव विविधतेच्या दृष्टीने नागरी देवराई प्रकल्प राबवण्यात येत आहे. देवराई योजनेंतर्गत नाशिकमधील निवडक उद्यानांमध्ये स्थानिक आणि दुर्मिळ वृक्षांची लागवड करण्यात येत आहे.
नाशिक : महानगरपालिकेतर्फे पर्यावरण आणि जैव विविधतेच्या दृष्टीने नागरी देवराई प्रकल्प राबवण्यात येत आहे. देवराई योजनेंतर्गत नाशिकमधील निवडक उद्यानांमध्ये स्थानिक आणि दुर्मिळ वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. प्रथमेश नगर ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क शेजारील ओपन जागेची देवराई प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. या उद्यानात ८० पेक्षा अधिक दुर्मिळ आणि स्थानिक वृक्षांची लागवड करण्यात आली. दुर्मिळ वृक्षांचे संवर्धन व्हावे, त्यांची माहिती नागरिकांना मिळावी आणि शहरात ऑक्सिजन पार्क तयार व्हावे यासाठी नाशिक देवराई प्रकल्प राबविण्यात आला.
प्रख्यात सिनेअभिनेते, सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवराई प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, महापौर रंजना भानसी, गटनेते अजय बोरस्ते, डॉ हेमलता पाटील, वैशाली भोसले, विलास शिंदे, गजानन शेलार, प्रियंका घाटे, सरिता सोनवणे आदी उपस्थित होते.