जिल्ह्यात सोमवारपर्यंत ९ हजारहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 03:10 PM2020-07-27T15:10:25+5:302020-07-27T15:16:12+5:30

कोरोनावर उपचारांनंतर कोरोनामुक्त झालेल्या ९ हजार ०३५ कोरोना बाधीतांना सोमवारी (दि.27) सकाळी अकरावाजेपर्यंत रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले असून जिल्ह्यात सद्यस्थितीत २ हजार ६७० रुग्णांवर उपचार सुरु असून  उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २१८ ने  रुग्ण संख्या कमी झाली आहे.  आत्तापर्यंत ४५७  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

More than 9,000 patients in the district have been corona free till Monday | जिल्ह्यात सोमवारपर्यंत ९ हजारहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

जिल्ह्यात सोमवारपर्यंत ९ हजारहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्दे कोरोनाबाधित रुग्णांपैकी ९ हजार  ०३५  रुग्ण पुर्णपणे बरेकोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालयातून  डिस्चार्जसध्या जिल्ह्यात  २ हजार ६७०  पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमधून कोरोनावर उपचारांनंतर कोरोनामुक्त झालेल्या ९ हजार ०३५ कोरोना बाधीतांना सोमवारी (दि.27) सकाळी अकरावाजेपर्यंत रुग्णालयांतून घरी सोडण्यात आल्याची माहिती नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत  सकाळी अकरावाजता प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातू देण्यात आली आहे. 
जिल्ह्यात सद्यस्थितीत २ हजार ६७० रुग्णांवर उपचार सुरु असून  उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २१८ ने  रुग्ण संख्या कमी झाली आहे.  आत्तापर्यंत ४५७  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या  नाशिकमध्ये १८७, चांदवड ५३, सिन्नर १४०, दिंडोरी ४७, निफाड १४१, देवळा ४८,  नांदगांव ८२, येवला ३७, त्र्यंबकेश्वर १७, सुरगाणा १४, पेठ ०३, कळवण ०२,  बागलाण ३९, इगतपुरी ७२, मालेगांव ग्रामीण ३८ असे एकूण  ९१९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६५८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ८६  तर जिल्ह्याबाहेरील ०७  असे एकूण २ हजार ६७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आतपर्यंत जिल्ह्यात  १२  हजार १६२ रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत नाशिक ग्रामीण १०७, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  २४७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८४  व जिल्हा बाहेरील १९ अशा एकूण ४५७  रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती  जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

Web Title: More than 9,000 patients in the district have been corona free till Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.