हुंड्यासाठी छळवणुकीचे गुन्हे अधिक

By admin | Published: December 28, 2015 10:30 PM2015-12-28T22:30:35+5:302015-12-28T22:32:49+5:30

अंबड पोलीस ठाणे : २०१५ मध्ये सुमारे ४००हून अधिक गुन्हे

More of crime for harassment | हुंड्यासाठी छळवणुकीचे गुन्हे अधिक

हुंड्यासाठी छळवणुकीचे गुन्हे अधिक

Next

नाशिक :मागील वर्षाप्रमाणेच २०१५ मध्ये हुंड्यासाठी छळवणूक करण्यात येत असलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याबरोबरच दुचाकी चोरी, अपघातात प्राण गमविणे व गंभीर अपघातांच्या घटना घडल्या आहेत. वर्षभरात खून, दरोडा, सोनसाखळी चोरी यांसह सुमारे चारशेहून अधिक गुन्हे दाखल झाल्याची नोंद अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अंबड पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी आटोक्यात आली असल्याचा दावा पोलीस करत असले तरी अनेक गंभीर घटना वर्षभरात घडल्या आहेत. घरासमोर व सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी चोरीच्या घटना यंदाच्या वर्षी मागील वर्षाच्या तुलनेत अधिक झाल्या आहेत. यापाठोपाठच अठरा वर्षाखालील मुला, मुलींना पळवून नेण्याच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा झाली हुं्याचे प्रमाणदेखील वाढल्याचे गुन्ह्याच्या नोंदीवरून दिसून येते. रस्त्यांचा विस्तार झालेला असला तरी अपघाताचे प्रमाण मात्र कमी झालेला नाही. दरवर्षी अपघात होऊन प्राण गमविणे तसेच अपघात होऊन यात गंभीर दुखापत होण्याचे प्रमाणही वाढतच असल्याचे पोलीस दप्तरी
नोंद असल्यावरून लक्षात येते. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी
चोरी होण्याचे प्रमाण कमी
झाल्याचे आकडेवारीवरून दिसून
येते.

Web Title: More of crime for harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.