ग्रामीण भागात फॅशनेबल गॉगलला अधिक मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 02:37 PM2019-05-14T14:37:15+5:302019-05-14T14:37:45+5:30

खमताणे : सध्या सुर्य आग ओकत असून दिवसेंदिवस उष्णतेचा प्रकोप वाढत आहे. त्यामुळे उन्हाच्या झळांपासून डोळ्याचा बचाव करण्यासाठी बाजारात गॉगल्सचे नवनवीन प्रकार आले आहेत.

 More demand for fashionable goggles in rural areas | ग्रामीण भागात फॅशनेबल गॉगलला अधिक मागणी

ग्रामीण भागात फॅशनेबल गॉगलला अधिक मागणी

Next

खमताणे : सध्या सुर्य आग ओकत असून दिवसेंदिवस उष्णतेचा प्रकोप वाढत आहे. त्यामुळे उन्हाच्या झळांपासून डोळ्याचा बचाव करण्यासाठी बाजारात गॉगल्सचे नवनवीन प्रकार आले आहेत. तरूणांमध्ये आजही हनिसिंग स्टाइल आणि मोठ्या फ्रेमचे गॉगल्स पसंतीस उतरत आहेत. फॅशन आणि सुरक्षा या दोन्ही गोष्टी साध्य व्हाव्यात, असा बहूतेकांचा हेतू असतो. बदलत्या फॅशनप्रमाणे विक्र ेत्यांनाही ग्राहकांकरिता आकर्षक मॉडेल्सच्या नवनवीन प्रकार उपलब्ध करून दिले आहेत. तरूणांमध्ये पोलोराइज लेन्सच्या गॉगलला पंसती दिली जात आहे. बच्चेकंपनीकरिता कार्बन कॅरिटर स्पेशल गॉगल्स बाजारात आले आहेत. वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या काही दिवसात विविध हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत. दिवसेंदिवस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वातावरणाच्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उन्हामुळे डोळ्यात जळजळ, डोळे सुजणे, लालसर होणे, डोळ्यांना थकवा जाणवणे, अशा प्रकारचा त्रास सर्वांना होत आहे . डोळ्यात धूळ जाणे अथवा धुराचा मारा झाल्यास दृष्टी जाण्याची शक्यता असल्याचे नेत्ररोगतज्ञ सांगतात. असे असले तरी डोळ्याच्या बचावासाठी महागडे गॉगल्स खरेदी करण्यापेक्षा ग्राहक छोट्या दुकानदारांनी रस्त्यावर थाटलेल्या दुकानांना पंसती देतात. पोलोराइज गॉगल्समुळे उन्हाच्या तिव्रतेचा प्रकाश आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करता येतो. रॅबन, इरिक्स, व्हेरिबल, लाइटवेट अशा प्रकारात काच, फायबर थ्रीडी आणि प्लोटोमन लेन्समध्ये गॉगल्स उपलब्ध आहेत.

Web Title:  More demand for fashionable goggles in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक