कोरोनामुक्त दुपटीहून अधिक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 01:58 AM2021-10-14T01:58:57+5:302021-10-14T02:00:53+5:30

जिल्ह्यात बुधवारी (दि. १३) एकूण ९४ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले असून, दुपटीहून अधिक १९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

More than double the corona free! | कोरोनामुक्त दुपटीहून अधिक !

कोरोनामुक्त दुपटीहून अधिक !

Next

नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि. १३) एकूण ९४ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले असून, दुपटीहून अधिक १९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात एकूण बाधितांपैकी ४६ बाधित नाशिक ग्रामीणचे तर ४४ नाशिक मनपा आणि ४ जिल्हाबाह्य बाधित आहेत. त्याशिवाय नाशिक ग्रामीणला एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ८६५० वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात उपचारार्थी रुग्णसंख्या ६६६ वर पोहोचली आहे. त्यात सर्वाधिक ३९३ नाशिक ग्रामीण, २४५ नाशिक मनपा, १६ मालेगाव मनपा तर १२ जिल्हाबाह्य नागरिकांचा समावेश आहे, तर १४०२ अहवाल प्रलंबित आहेत. त्यात १००९ अहवाल नाशिक ग्रामीणचे, २३८ नाशिक मनपाचे, १५५ मालेगाव मनपाचे अहवाल प्रलंबित आहेत.

इन्फो

कोरोनामुक्त ४ लाखांवर

जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४ लाख १६७ वर पोहोचली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४ लाख ९ हजार ४८३ रुग्ण बाधित झाले होते. त्यातील ४ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले, ही जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे. त्यात सर्वाधिक कोरोनामुक्त रुग्ण २ लाख २६ हजार ६१७ हे नाशिक मनपाचे तर नाशिक ग्रामीणचे १ लाख ५१ हजार ५९४, मालेगाव मनपाचे १२ हजार २९२ तर जिल्हाबाह्य ५७४८ आणि अन्य ३९१६ जणांचा समावेश आहे.

Web Title: More than double the corona free!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.