दुपटीहून अधिक कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:19 AM2020-12-30T04:19:45+5:302020-12-30T04:19:45+5:30

नाशिक : जिल्ह्यात सोमवारी (दि. २८) एकूण २१६ रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून, त्या तुलनेत दुपटीहून अधिक म्हणजे ४९७ ...

More than double corona free | दुपटीहून अधिक कोरोनामुक्त

दुपटीहून अधिक कोरोनामुक्त

Next

नाशिक : जिल्ह्यात सोमवारी (दि. २८) एकूण २१६ रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून, त्या तुलनेत दुपटीहून अधिक म्हणजे ४९७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात एकूण ५ जणांचा मृत्यू झाला असल्याने एकूण बळींची संख्या १९५५ वर पोहोचली आहे.

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ९ हजार ३३५ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख ५ हजार ३१४ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर २०६६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.३२ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९६.८५, नाशिक ग्रामीण ९५.७०, मालेगाव शहरात ९२.९२, तर जिल्हाबाह्य ९३.४६ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २०६६ बाधित रुग्णांमध्ये १२८९ रुग्ण नाशिक शहरात, ६१३ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १४८ रुग्ण मालेगावमध्ये, तर १६ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या चार लाख २५ हजार १० असून, त्यातील ३ लाख १४ हजार ३८२ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख ९ हजार ३३५ रुग्ण बाधित आढळून आले असून, १२९३ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

Web Title: More than double corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.