अकरा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली सीईटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 09:54 PM2020-10-08T21:54:44+5:302020-10-09T01:22:58+5:30
नाशिक :वैद्यकीय, औषधनिर्माण शास्त्र क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महासीईटीकडून गुरुवार (दि.१)पासून शहरातील १२ परीक्षा केंद्रावर सीईटी घेण्यात येत शुक्रवारी ( दि.९) पीसीबी गटासाठी शेवटचा दिवस असणार आहे. या गटात आत्तापर्यंत सुमारे ११हजार६५९ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली आहे. तब्बल ४हजार २७३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारली आहे.

पीसीबी गटाची सीईटी ९ आॅक्टोबरपर्यंत असून त्यानंतर १२ ते २० आॅक्टोबर या कालावधीत पीसीएम गटासाठी सीईटी होणार आहे. सीईटी परीक्षेसाठी शहरात १२ केंद्र निश्चित करण्यात आली असून या सर्व परीक्षा केंद्रांवर येर्णाया विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी नियमित निर्जंतुकीकरण प्रक्रिया होत आहे. त्यानंतरच विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी प्रवेश दिला जात आहे. तत्पूर्वी विद्यार्थ्यांचे तपमानही मोजले जात असून सॅनिटायझर ही उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना प्रवेश देताना व परीक्षा केंद्रातून बाहेर पडताना फिजिकल डिस्टेंसच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्ष परीक्षा दुपारी २:३० वाजता सुरू होत असताना विद्यार्थ्यांना मात्र १२:३० वाजता परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काही काळ परीक्षेसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे.
चार हजार २७३ विद्यार्थ्यांची दांडी
सीईटी परीक्षेच्या पीसीबी गटासाठी आतापर्यंत ०६ दिवसांतील बारा सत्रांमध्ये १५ हजार ९३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा देणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ११ हजार ६५९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली तर उर्वरित चार हजार २७३ विद्यार्थी विविध कारणांनी या परीक्षेला गैरहजर राहिल्याचे दिसून आले.