मोरे कुटुंबीयांनी जपली इको फ्रेंडली मूर्तीकला !
By admin | Published: August 19, 2016 01:05 AM2016-08-19T01:05:15+5:302016-08-19T01:06:25+5:30
पर्यावरणपूरक गणपती : गेल्या आठ दशकांपासून ‘शाडू एके शाडू’चा घेतला ध्यास
Next
नाशिक : जलप्रदूषणात भर टाकणाऱ्या पर्यावरणास हानीकारक अशा प्लाटर आॅफ पॅरिसच्या मूर्ती बनवू नयेत, असे निर्देश सहा वर्षांपूर्वी औरंगाबाद खंडपीठाने देऊनही बाजारात पीओपीच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल होत आहेत. बख्खळ कमाई करून देणाऱ्या पीओपीच्या मूर्ती बाजारात आणल्या जात असताना गेल्या ८२ वर्षांपासून ‘शाडू एके शाडू’ हाच ध्यास घेत शाडू मातीकामातून गणेशमूर्ती घडविण्याचा वसा नाशिकमधील सिडकोतील मोरे कुटुंबीय जोपासत आले आहे. मोरे कुटुंबीयांच्या इको फ्रेंडली गणेशमूर्तीची कीर्ती सातासमुद्रापल्याड जाऊन पोहोचली असून, यंदा कॅनडा, इंग्लंडमधील मॅँचेस्टर याठिकाणी शाडूमातीतील बाप्पा जाऊन पोहोचले आहेत.