दशकभरात नाशिकमधील पन्नास टक्क्यांहून अधिक विद्यार्थी शिक्षण हक्कापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 05:42 PM2019-11-24T17:42:26+5:302019-11-24T17:47:45+5:30
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर नाशिक जिल्ह्यात २०१२-१३ पासून २०१७-१९ पर्यंत एक एकदाही उपलब्ध जागेच्या पन्नास टक्के प्रवेश होऊन शकलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पन्नास टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचीत राहत असून चालू शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू झाल्यानंतर सुमारे जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया चालवून चार प्रवेशफेºया घेऊनही जिल्हाभरातील सुमारे तेराशे विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित राहिले समोर आले आहे.
नाशिक : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर नाशिक जिल्ह्यात २०१२-१३ पासून २०१७-१९ पर्यंत एक एकदाही उपलब्ध जागेच्या पन्नास टक्के प्रवेश होऊन शकलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पन्नास टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचीत राहत असून चालू शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू झाल्यानंतर सुमारे जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया चालवून चार प्रवेशफेºया घेऊनही जिल्हाभरातील सुमारे तेराशे विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित राहिल्याचे वास्तव समोर आले आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेतील त्रूटींचा फायदा घेऊन प्रत्यक्ष पात्रताधारकांऐवजी तांत्रिकदृष्या प्रवेश प्रक्रियेचे निकष पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिले जात असल्याने अशाप्रकारे मोठया प्रमाणात विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहत असल्याचे मत पालकांकडून व्यक्त होत असून किमान येणाºया शैक्षणिक वर्षातील प्रवेशप्रक्रियेत तरी सुधारणा होण्याची अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे. शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत मागास व आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव २५ टक्के जागा राखीव आहेत. मात्र किचकट प्रवेशप्रक्रिया आणि कायद्यातील पळवाटांचा वापर करून आरक्षणाचा लाभ घेणाºयांमुळे जिल्हाभरातील पन्नास टक्क्यांहून अधिक विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहीले आहेत. तर चालू शैक्षणिक वर्षातही तेराशे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळू शकलेला नाही. तब्बल चार महिने प्रवेशप्रक्रिया चालूनही १२९९ विद्यार्थ्यांना जागा रिक्त राहिल्या आहेत. जागा रिक्त असूनही प्रवेश मिळणार नसतील तर शिक्षणाचा हक्क मिळणार कसा? असा प्रश्न शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत आगामी शैक्षणिक वर्षात राखीव जागांवर प्रवेश मिळवू इच्छिणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांकडून उपस्थित केला जात आहे.