जितके नवे बाधित तितकेच कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:20 AM2021-06-16T04:20:30+5:302021-06-16T04:20:30+5:30

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरी मंगळवारी (दि. १५) एकाच दिवसात पाचशेहून अधिक रुग्ण आढळले होते. ...

The more newly infected the more coronal free | जितके नवे बाधित तितकेच कोरोनामुक्त

जितके नवे बाधित तितकेच कोरोनामुक्त

Next

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरी मंगळवारी (दि. १५) एकाच दिवसात पाचशेहून अधिक रुग्ण आढळले होते. एकाच दिवसात ५९२ रुग्ण आढळल्याने ही धोक्याची घंटा जाणवत होती. मात्र, नंतर रुग्ण संख्या कमी झाली. सोमवारी पुन्हा नव्याने आढळणाऱ्या बाधितांची संख्या कमी होऊन २०६ झाली, तर मंगळवारी केवळ १५५ नवीन बाधित आढळले. तितकेच रुग्ण कोरोनामुक्तदेखील झाले आहेत. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे गेल्या ४८ तासात अवघ्या तीन बळींची नोंद झाली आहे.

सद्यस्थितीत कोराेनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी होत असली तरी पोर्टलवर प्रलंबित मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. मंगळवारी २८४ रुग्णांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. आणखी काही दिवस प्रलंबित मृत्यूंची नोंद होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिली.

Web Title: The more newly infected the more coronal free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.