कर्जमाफीसाठी एक लाखाहून अधिक अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 01:04 AM2017-08-25T01:04:02+5:302017-08-25T01:04:13+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून शेतकरी कर्जमाफी, पीक पाहणी व पाण्याची परिस्थितीची माहिती जाणून घेतली.
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून शेतकरी कर्जमाफी, पीक पाहणी व पाण्याची परिस्थितीची माहिती जाणून
घेतली.
नाशिक जिल्ह्णातील एक लाख आठ हजार शेतकºयांनी आजवर त्यासाठी अर्ज केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. राज्य सरकारने कर्जबाजारी शेतकºयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान योजनेची घोषणा केली असून, त्यासाठी अर्ज करण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत देण्यात आली आहे. पीक, पाण्याच्या उपलब्धतेबाबतही मुख्यमंत्र्यांनी माहिती जाणून घेतली असता, त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्णात खरिपाच्या शंभर टक्क्यांहून अधिक पेरण्या झाल्याचे सांगण्यात आले तसेच धरणांमध्ये ८० टक्के पाणीसाठा असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.