एक लाख टनांहून अधिक द्राक्षांची निर्यात ; मागील वषार्च्या तुलनेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 03:51 PM2019-04-09T15:51:54+5:302019-04-09T15:53:35+5:30

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्ष नियार्तीत २५ ते ३० टक्कयांनी वाढ झाली असून गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातून जवळपास आठ हजार चारशे  कंटेनरच्या माध्यमातून सुमारे १ लाख टनांहून अधिक द्राक्षांची युरोप व इंग्लडच्याबाजारपेठेत निर्यात झाली होती. तर एकट्या रशियातत सुमारे एक हजार कंटेनर द्राक्षंची निर्यात झाली असून श्रीलंका, बांगलादेश, मध्यपूर्व आशियात मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात सुरु असून एप्रिल अखेरपर्यंत निर्याचा  आकडा दोन लाख टनाचा टप्पा पार करण्याची शक्यता द्राक्ष बागायतदार संघाकडून व्यक्त होत आहे. 

More than one lakh tons of grapes export; Growth compared to the previous year | एक लाख टनांहून अधिक द्राक्षांची निर्यात ; मागील वषार्च्या तुलनेत वाढ

एक लाख टनांहून अधिक द्राक्षांची निर्यात ; मागील वषार्च्या तुलनेत वाढ

Next
ठळक मुद्देद्राक्ष निर्यातीत यावर्षी 20 ते 25 टक्के वाढ आतापर्यंत एक लाख टनांहून अधिक निर्यात

नाशिक : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्ष नियार्तीत २५ ते ३० टक्कयांनी वाढ झाली असून गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातून जवळपास आठ हजार चारशे  कंटेनरच्या माध्यमातून सुमारे १ लाख टनांहून अधिक द्राक्षांची युरोप व इंग्लडच्याबाजारपेठेत निर्यात झाली होती. तर एकट्या रशियातत सुमारे एक हजार कंटेनर द्राक्षंची निर्यात झाली असून श्रीलंका, बांगलादेश, मध्यपूर्व आशियात मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात सुरु असून एप्रिल अखेरपर्यंत निर्याचा  आकडा दोन लाख टनाचा टप्पा पार करण्याची शक्यता द्राक्ष बागायतदार संघाकडून व्यक्त होत आहे. 
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्ष नियार्तीत २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातून ८८ हजार २०२ टन द्राक्षे युरोपीय बाजारपेठेत निर्यात झाली होती. यंदा त्यात वाढ होऊन आतापर्यंत तब्बल एक ते सव्वा लाख टन द्राक्ष निर्यात झाली आहे. पाणीटंचाई, दीर्घ काळ रेंगाळलेली थंडी याचा परिणाम होऊनही यंदा द्राक्षांची आवक वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे यंदा गारपिटीसारखी मोठी आपत्ती द्राक्षांवर कोसळली नाही. त्यामुळे द्राक्षांचे उत्पादन वाढलेले असताना देशांतर्गत तसेच युरोपच्या बाजारपेठेत काही काळ आवक जास्त असल्याने द्राक्ष बाजारात मंदीचेच वातावरण पाहायला मिळाले. परंतु काही दिवसांपूर्वी ४० ते  ५० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचलेले द्राक्षांचे दर आता ५० ते ९० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. युरोपसह जगातील इतरही देशांत भारतीय द्राक्षांना मागणी असून भारतातून ८ हजार चारशे  कंटेनरमधून निर्यात झाली आहे. त्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे ४८०८ कंटेनर निर्यात नेदरलँड मध्ये झाली असून त्या खालोखाल युरोपातील आघाडीवर असलेले जर्मनीत १४३३, इंग्लंड मध्ये १३१७, डेन्मार्क मध्ये १७३ व फिनलँड मध्ये १२४ कंटेनर निर्यात झाली आहे. 

Web Title: More than one lakh tons of grapes export; Growth compared to the previous year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.