‘मेक इन इंडिया’त उद्योजकांना अधिक संधी

By admin | Published: January 31, 2016 11:00 PM2016-01-31T23:00:46+5:302016-01-31T23:05:48+5:30

प्रताप जाधव : रोड शोला प्रतिसाद; राज्यात परदेशी गुंतवणूक आणणे होणार शक्य

More opportunities for entrepreneurs in Make in India | ‘मेक इन इंडिया’त उद्योजकांना अधिक संधी

‘मेक इन इंडिया’त उद्योजकांना अधिक संधी

Next

सातपूर : मेक इन इंडिया हा उपक्र म आयोजनाची एक मोठी संधी महाराष्ट्राला मिळाली असून, या उपक्रमाद्वारे राज्यात परदेशी गुंतवणूक आणणे शक्य होणार असल्याने नाशिकमधील उद्योजकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप जाधव यांनी केले.
सीआयआय आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर येथे आयोजित रोड शोमध्ये ते बोलत होते. जाधव यांनी सविस्तर मार्गदर्शन करताना सांगितले की,आठवडाभर चालणाऱ्या या उपक्र मात प्रदर्शनासह, गुंतवणूकदारांची बैठक, महाराष्ट्र कल्चर नाइटसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या उपक्रमात सहभागी होणाऱ्या उद्योजकांनी मेक इन इंडियाच्या संकेतस्थळावर आॅनलाइन नोंदणी करायची असून विनाशुल्क सहभाग घेता येणार आहे. व्यासपीठावर बॉश कंपनीचे उपाध्यक्ष एच. बी. थोन्टेश, के.एस.बी. पंपचे प्रकल्प प्रमुख सुनील बापट, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संध्या घोडके, सीआयआयचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुधीर मुतालिक उपस्थित होते. प्रास्तविक सुधीर मुतालिक यांनी केले. मुकेश गुप्ता यांनी आभार मानले. (वार्ताहर)‘मेक इन इंडिया’ या उपक्र माविषयी मार्गदर्शन करताना औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप जाधव. समवेत सुनील बापट, एच. बी. थोन्टेश, सुधीर मुतालिक, संध्या घोडके, मुकेश गुप्ता आदि.

Web Title: More opportunities for entrepreneurs in Make in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.