क्षमतेपेक्षा जास्त  विद्यार्थी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:57 AM2018-02-24T00:57:32+5:302018-02-24T00:57:32+5:30

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया नाशिक शहरातील रिक्षा, व्हॅन व अन्य चारचाकी खासगी वाहनांत क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असून, अशा वाहनचालकांकडून उघडपणे वाहतूक नियमांची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शेकडो शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव यामुळे धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.

 More student traffic than capacity | क्षमतेपेक्षा जास्त  विद्यार्थी वाहतूक

क्षमतेपेक्षा जास्त  विद्यार्थी वाहतूक

googlenewsNext

पंचवटी : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया नाशिक शहरातील रिक्षा, व्हॅन व अन्य चारचाकी खासगी वाहनांत क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असून, अशा वाहनचालकांकडून उघडपणे वाहतूक नियमांची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शेकडो शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव यामुळे धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.  शहरातील विविध शाळांतील शेकडो विद्यार्थी रिक्षा तसेच व्हॅनमधून दैनंदिन प्रवास करतात. विद्यार्थी वाहतूक करणाºया व्हॅन तसेच रिक्षात मोजके विद्यार्थी बसवून वाहतूक करणे गरजेचे असले तरी काही विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनचालकांकडून व्हॅन तसेच रिक्षामध्ये कोंबून विद्यार्थी बसविण्याचे काम केले जाते. विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनात मोजक्या विद्यार्थ्यांची वाहतूक केली तर परवडत नसल्याचे विद्यार्थी वाहतूक करणाºया रिक्षा व व्हॅन चालकांकडून सांगितले जाते. मात्र नियमांची उघडपणे पायमल्ली करून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करत जीव धोक्यात घालण्याचे काम बेशिस्त वाहनचालक करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.
परिवहन विभागाचे दुर्लक्ष 
व्हॅनमध्ये २० ते २५ व रिक्षात ८ ते १० शाळकरी विद्यार्थी बसवून जीवघेणी वाहतूक केली जात आहे. दाटीवाटीने व क्षमतेपेक्षा जास्त शाळकरी विद्यार्थी बसवून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनचालकांकडे जास्त विद्यार्थी वाहतूक केली जात असली तरी वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.

Web Title:  More student traffic than capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.