शहरातील दहा हजाराहून अधिक बुजवले खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 12:10 AM2020-10-02T00:10:16+5:302020-10-02T01:31:35+5:30

नाशिक- पावसाळ्यामुळे शहरात खड्डे पडल्याने नागरीकांना चालणे कठीण झाले होते तर अनेक ठिकाणी अपघात होत होते. महापौरांनी आदेश देऊनही खड्डे ...

More than ten thousand dug wells in the city | शहरातील दहा हजाराहून अधिक बुजवले खड्डे

शहरातील दहा हजाराहून अधिक बुजवले खड्डे

googlenewsNext
ठळक मुद्देउर्वरीत रस्ते दरवर्षी महापालिका विशेष निधीची तरतूद करून बुजवते.

नाशिक- पावसाळ्यामुळे शहरात खड्डे पडल्याने नागरीकांना चालणे कठीण झाले होते तर अनेक ठिकाणी अपघात होत होते. महापौरांनी आदेश देऊनही खड्डे जैथे असल्याने लोकमतने रिअ­ॅलीटी चेकमध्ये परिस्थती उघड केल्यानंतर प्रशासनाने खड्डे बुजवण्यास सुरूवात केली आहे. आत्तापर्यंत दहा हजार खड्डे बुजवल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
दरवर्षी पावसाळा आणि खड्डे हे आता समीकरण झाले आहे. दरवर्षी पावसामुळे रस्त्यांची चाळण होते आणि नागरीकांचे हाल होतात. यंदा गतवर्षी सारखा शहरात जोरदार पाऊस झाला नसला तरी सर्वच भागात रस्त्यांची चाळण झाली होती.
महापालिकेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या टिळकवाडीतून काकतकर रूग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावर तर चालणे कठीण झाले आहे. अन्य भागात यापेक्षा गंभीर स्थिती आहे. रस्ते तयार केल्यानंतर त्याचे तीन ते पाच वर्षे दायित्व
संबंधीत ठेकेदाराकडे असते, असे सांगितले जाते तर उर्वरीत रस्ते दरवर्षी महापालिका विशेष निधीची तरतूद करून बुजवते. मात्र, सामान्य नागरीकांना या तांत्रिकतेपेक्षा खड्डे बुजवणे महत्वाचे असते. महापौर सतीश कुलकर्णी
यांनीं आॅगस्ट महिन्याच्या अखेरीसच आठ दिवसात शहरत खड्डे मुक्त करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र,त्यानंतर देखील खडडे कायम असल्याचे लोकमतने केलेल्या रियॅलीटी चेकमध्ये आढळले होते. त्याची दखल घेऊन अखेरीस महापालिकेने विविध भागातील खड्डे बुजविण्यास वेग आला आणि सुमारे दहा हजार खड्डे बुजवले आहेत.

 

Web Title: More than ten thousand dug wells in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.