शहरातून तीनशेहून अधिक स्पर्धा परीक्षार्थी मोर्चात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:29 AM2018-03-14T01:29:34+5:302018-03-14T01:29:34+5:30

नाशिक : मुंबई येथे मंगळवारी (दि. १३) महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा देणाºया परीक्षार्थींचा मोर्चा धडकला. आयोगाच्या भोंगळ कारभाराविरोधात परीक्षार्थींनी ‘आक्रोश’ मोर्चा काढला. या मोर्चात नाशिकमधून सुमारे तीनशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

More than three hundred contestants from the city competitor's roster | शहरातून तीनशेहून अधिक स्पर्धा परीक्षार्थी मोर्चात

शहरातून तीनशेहून अधिक स्पर्धा परीक्षार्थी मोर्चात

googlenewsNext
ठळक मुद्दे(एमपीएससी) परीक्षा देणाºया परीक्षार्थींचा मोर्चा मोर्चासाठी सर्व विद्यार्थी संघटना एकवटल्या

नाशिक : मुंबई येथे मंगळवारी (दि. १३) महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा देणाºया परीक्षार्थींचा मोर्चा धडकला. आयोगाच्या भोंगळ कारभाराविरोधात परीक्षार्थींनी ‘आक्रोश’ मोर्चा काढला. या मोर्चात नाशिकमधून सुमारे तीनशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
राज्य स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघर्ष समितीच्या वतीने आझाद मैदानावर मोर्चा काढण्यातआला होता. या मोर्चासाठी सर्व विद्यार्थी संघटना एकवटल्या होत्या. आयोगाने भरतीच्या जागा वाढवाव्या, हजारो परीक्षार्थींचा विचार सरकारने करावा आदी मागण्यांसाठी नाशिक, औरंगाबाद, पुणे आदी शहरांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर मंगळवारी (दि. १३) विद्यार्थ्यांनी मुंबईत ‘आक्रोश’ मोर्चा काढला. या मोर्चाबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सरक ारची बाजू मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली. जागा वाढविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मोठ्या प्रमाणात आयोगाकडून जागा काढल्या जातील यासाठी प्रयत्न करू, असे फडणवीस म्हणाले. खासगी क्लासेसचालकांचा या आंदोलनामागे छुपा हात असल्याचाही गंभीर आरोप फडणवीस यांनी यावेळी केला.
नाशिक शहरासह जिल्हाभरातून सुमारे तीनशेहून अधिक स्पर्धा परीक्षार्थी मोर्चात सहभागी झाले होते. सरळ सेवेतील तीस टक्के कपातीचे धोरण तत्काळ रद्द करावे, जिल्हा परिषद, जलसंपदा, समाजकल्याण, महिला व बालकल्याण विभागासह सर्व विभागांमधील रिक्त जागा शंभर टक्के भराव्या, शिक्षकांची रिक्त असलेली २४ हजार पदे त्वरित भरावी, जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांना कुलूप ठोकू नये, सर्व स्पर्धा परीक्षांचे शुल्क शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत आकारावे, सुशिक्षित बेरोजगारांना प्रतिमाह दोन हजार रुपये निर्वाह भत्ता द्यावा, आयोगाच्या सर्व पदांसाठी प्रतीक्षा यादी जाहीर करावी, पोलीस भरतीमधील पदांची संख्या वाढवावी अशा विविध मागण्या मोर्चेकºयांनी सरकारपुढे मांडल्या.
नाशिकमधूनदेखील या मोर्चाला प्रतिसाद लाभला. सुमारे तीनशेपेक्षा अधिक विद्यार्थी मोर्चासाठी नाशिकमधून सहभागी झाले होते, अशी माहिती समितीच्या जिल्हा समन्वयक सुवर्णा पगार यांनी दिली.

टीप- सदरची बातमी मुंबईहून येणार असून त्यात नाशिकच्या सहभागाची बातमी करता येईल अथवा मुंबईतून बातमी न आल्यास हीच बातमी वापरता येईल.

Web Title: More than three hundred contestants from the city competitor's roster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.