आणखी ट्रॅव्हल्स कंपन्या येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 01:07 AM2019-02-09T01:07:38+5:302019-02-09T01:08:13+5:30
राज्य परिवहन महामंडळाने शिवशाहीच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ झाल्याचा दावा केला असला तरी शिवशाहीचे होणारे अपघात, प्रवासी संख्येतील घट आणि चालकांविषयी प्रवाशांना वाटणारा विश्वास याबाबतीत महामंडळ तोट्यातच असल्याचा आरोप महाराष्टÑ एस. टी. ड्रायव्हर कंडक्टर मॅकेनिक युनियनच्या वतीने करण्यात आला आहे.
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने शिवशाहीच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ झाल्याचा दावा केला असला तरी शिवशाहीचे होणारे अपघात, प्रवासी संख्येतील घट आणि चालकांविषयी प्रवाशांना वाटणारा विश्वास याबाबतीत महामंडळ तोट्यातच असल्याचा आरोप महाराष्टÑ एस. टी. ड्रायव्हर कंडक्टर मॅकेनिक युनियनच्या वतीने करण्यात आला आहे. कोणत्याही चुकीसाठी एकीकडे महामंडळाच्या ड्रायव्हरवर केसेस केल्या जात असताना खासगी शिवशाहीच्या चालकला मात्र अभय देण्यात येत असल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे.
राज्य परिवहन महामंडळात सध्या पाच बड्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या शिवशाही बसेस राज्यातील विविध डेपोंमध्ये धावत आहेत. महामंडळ आणखी काही गाड्या घेण्याच्या तयारीत असून, नवीन ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा महामंडळाच्या हालचाली असल्याने महामंडळच्या चालक-वाहकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या कर्मचाऱ्यांनी आता शिवशाहीला विरोध करण्याबरोबरच चालक-वाहकांना काम मिळावे तसेच तसेच ड्युटी अलोकेशन टी-९ पद्धतीने करावी, अशी मागणी केली आहे. महामंडळाच्या चालकांना ड्युटी मिळेल अशी हमी महामंडळाने द्यावी या मागणीसाठी आता संघटना प्रयत्नशील असल्याचे समजते.
खासगी शिवशाही बसेस चालकांच्या गाड्यांना अपघात होत असल्याचा आरोप महाराष्टÑ एस. टी. ड्रायव्हर-कंडक्टर मॅकेनिक युनियनच्या वतीने करतानाच मागील काही महिन्यांपासून मोठे अपघात झाल्याचे या कर्मचाºयांचे म्हणणे आहे. गेल्यावर्षी ९ मे रोजी बोरीवली-कराड, ३० मे रोजी यवतमाळ, १७ जून रोजी लातूर, ३ जुलै रोजी नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि ४ जुलै रोजी पेठ येथे शिवशााही बसेसचे अपघात झाले असल्याचे सांगण्यात आले.
खासगी शिवशाहीमध्ये पुणेकडे जाणारा चालक कॅबीनमध्ये प्रवासी बसवून घेऊन जात असताना दुसरीकडे महामंडळाच्या बस मध्ये एकजरी प्रवासी विनातिकीट आढळला किंवा १ रुपया जरी वाहकाच्या हिशेबात कमी आला तरी त्याच्या चार्जशिट दाखल केले जाते. परंतु खासगी चालकाला महामंडळाचे कोणतेही बंधन नाही. याउलट तो महामंडळाचा गणवेश परिधान करून खासगी वाहन चालवत असल्याने प्रवाशांची फसगत होत आहे.
शिवशाहीविरोधात कर्मचाºयांचे उपोषण
राज्य महामंडळाने शिवशाही बसेस सुरू केल्यापासून नाशिक डेपो १ मधील कर्मचाºयांना काम मिळत नसल्याने तसेच चालक-वाहकांची बदली केली जात असल्याच्या निषेधार्थ चालक-वाहक संघटनेच्या वतीने शिवशाही धोरणाच्या विरोधात संप पुकारला होता़ नाशिक डेपोत शिवशाही आल्यापासून महामंडळाचे कायम स्वरूपी चालक-वाहक, यांत्रिक कर्मचाºयांना काम मिळत नसल्याचे या कर्मचाºयांचे म्हणणे आहे़ शिवशाही बसेस आणि चालकांसाठी पायघड्या घातल्याजात असताना महामंडळ कर्मचाºयांवर मात्र कारवाई केली जात असल्याने प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली जाईल असे महाराष्ट्र एसटी ड्रायव्हर, कंडक्टर, मॅकेनिक युनियनचे नेते कैलास कराड यांनी सांगितले़