कोरोनामुक्तांपेक्षा दुपटीहून अधिक बाधित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:42 AM2021-02-20T04:42:44+5:302021-02-20T04:42:44+5:30
नाशिक : कोरोनाबाधित संख्येने शुक्रवारी (दि, १९) पुन्हा तीनशेचा आकडा ओलांडून ३३५ पर्यंत पोहोचला. तर १४५ रुग्ण हे कोरोनामुक्त ...
नाशिक : कोरोनाबाधित संख्येने शुक्रवारी (दि, १९) पुन्हा तीनशेचा आकडा ओलांडून ३३५ पर्यंत पोहोचला. तर १४५ रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून शहरात २ तर ग्रामीणला १ रुग्णाचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या २०८२ पर्यंत पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख १९ हजार ३५४ वर पोहोचली असून, त्यातील एक लाख १५ हजार ७२८रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर १,५४४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.९६ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.५२, नाशिक ग्रामीण ९६.४०, मालेगाव शहरात ९२.५९, तर जिल्हाबाह्य ९४.३४ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख २५ हजार ५७५ असून, त्यातील चार लाख ५ हजार ६३५ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख १९ हजार ३५४ रुग्ण बाधित आढळून आले असून, ४८६ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.