दुपटीहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 12:51 AM2020-11-14T00:51:01+5:302020-11-14T00:51:55+5:30
जिल्ह्यात शुक्रवारी (दि.१३) नाशिकमध्ये अवघ्या २०६ बाधितांची नोंद झाली असून, ४२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बाधित रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या दुपटीहून अधिक असल्याने जिल्ह्यातील आरोग्य विभागालादेखील काहीसा दिलासा मिळाला आहे.
नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि.१३) नाशिकमध्ये अवघ्या २०६ बाधितांची नोंद झाली असून, ४२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बाधित रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या दुपटीहून अधिक असल्याने जिल्ह्यातील आरोग्य विभागालादेखील काहीसा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३, जिल्हाबाह्य १ आणि नाशिक शहरात २ याप्रमाणे ६ मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या १७२५ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या ९६ हजार ६३६ वर पोहोचली असून, त्यातील ९२ हजार २६७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर २६४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९५.४८ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९६.०६, नाशिक ग्रामीणला ९४.५६, मालेगाव शहरात ९३.१७, तर जिल्हाबाह्य ९२.७२ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २८०७ बाधित रुग्णांमध्ये १६३२ रुग्ण नाशिक शहरात, ८७९ रुग्ण नाशिक ग्रामीणला, ११८ रुग्ण मालेगावमध्ये, तर १५ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या ३ लाख ५१ हजार ६४६ झाली आहे. त्यातील २ लाख ५४ हजार ४५१ रुग्ण निगेटिव्ह, तर ९६ हजार ६३६ रुग्ण बाधित आढळून आले असून, ५५९ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.