शहरात ग्रामीणपेक्षा दुपटीहून अधिक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:11 AM2021-06-06T04:11:54+5:302021-06-06T04:11:54+5:30

नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (दि.५) एकूण ४९५ नवीन बाधित आढळले असून, ८९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, बळींच्या संख्येत ...

More than twice as many victims as in rural areas | शहरात ग्रामीणपेक्षा दुपटीहून अधिक बळी

शहरात ग्रामीणपेक्षा दुपटीहून अधिक बळी

Next

नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (दि.५) एकूण ४९५ नवीन बाधित आढळले असून, ८९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, बळींच्या संख्येत पुन्हा वाढ झाली असून ४७ बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ४९१७ वर पोहोचली आहे. शहरात ग्रामीणच्या तुलनेत दुपटीहून अधिक बळी गेले आहेत.

जिल्ह्यात कोरोना रुग्ण आठवडाभरापासून ५००च्या आसपास रहात असले तरी बळींचे प्रमाण सातत्याने ४०हून अधिक राहत असल्याने बळींच्या प्रमाणात घट कशी आणावी, हीच चिंता आरोग्य विभागाला सतावते आहे. शनिवारीदेखील पुन्हा एकदा नाशिक ग्रामीणपेक्षा नाशिक महानगरातील बळींची संख्या दुपटीहून अधिक झाली आहे. ग्रामीणला १५, तर शहरात ३१ आणि मालेगाव मनपा एक याप्रमाणे ४७ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याने बळींच्या प्रमाणात नियंत्रण आणण्यावरच आरोग्य यंत्रणेला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. नाशिक शहरात दिवसभरात नवीन १८२, ग्रामीणला २९५ मालेगाव मनपात ११, तर जिल्हाबाह्य ७, असे बाधितांचे प्रमाण राहिले. दरम्यान, जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांचे प्रमाणदेखील १,२३८ वर आले असून, त्यात ग्रामीणचे ६३३, नाशिक शहराचे २९६, तर मालेगाव मनपाचे ३०९ इतके आहे. दरम्यान, एकूण उपचारार्थी रुग्णसंख्या ६,७४८ वर पोहोचली असून, त्यात नाशिक ग्रामीणचे ३४९१, नाशिक मनपाचे ३,०४२, तर मालेगाव मनपाचे १९५ आणि जिल्हाबाह्य २० रुग्णांचा त्यात समावेश आहे.

कोरोनामुक्त प्रमाण ९७ टक्क्यांवर

जिल्ह्यातील कोरोनामुक्त नागरिकांचे प्रमाण बरोबर ९७ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यात नाशिक मनपात ९७.७१, ग्रामीण ९५.९८ , मालेगाव मनपा ९५.८६, तर जिल्हाबाह्य ९७.७३ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तचे प्रमाण गतवर्षीदेखील ९८ टक्क्यांवर गेले होते. मात्र, त्यानंतरही पुन्हा दुसरी लाट आल्याने अद्यापही नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.

Web Title: More than twice as many victims as in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.