शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 01:20 AM2019-05-01T01:20:55+5:302019-05-01T01:21:14+5:30
नाशिक लोकसभा मतदारसंघात असलेल्या चार त्यातही खरे तर तीन शहरी विधानसभा मतदान केंद्रे असून, या तीन मतदारसंघांच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी अधिक वाढली असल्याने यंदा ग्रामीण भाग निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहेत.
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात असलेल्या चार त्यातही खरे तर तीन शहरी विधानसभा मतदान केंद्रे असून, या तीन मतदारसंघांच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी अधिक वाढली असल्याने यंदा ग्रामीण भाग निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहेत.
नाशिक लोकसभा मतदार-संघात पूर्व, पाश्चिम आणि मध्य नाशिक हे तीन पूर्णत: शहरी विधानसभा मतदान केंद्रे आहेत. देवळाली मतदारसंघात नाशिक महापालिकेच्या हद्दीचा काही भाग असून, उर्वरित भाग नाशिक तालुक्यातील संसरी, एकलहरे, शिंदे गाव आहे, तर सिन्नर, इगतपुरी- त्र्यंबक हे विधानसभा मतदारसंघ पूर्णत: ग्रामीण भागातील आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शहरी मतदारांची संख्या दहा लाख इतकी आहे. त्यामुळे ते निर्णायक मानले जात असले तरी सोमवारी (दि. २९) झालेल्या मतदानात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदान अधिक झाले. नाशिक पूर्व मतदारसंघात ५५.०६, पश्चिममध्ये ५५.४३, तर नाशिक मध्य मतदारसंघात ५५.९६ टक्के मतदान झाले आहे, तर ग्रामीण बहुल भागाचा समावेश असलेल्या देवळालीत ६०.७३ टक्के, सिन्नरमध्ये ६४.९७, तर इगतपुरी मतदारसंघात ६७.६० टक्के मतदान झाले आहे.
६९ पैकी १६ मतदान
केंद्रांवर नीच्चांकी मतदान
नाशिक पूर्व मतदारसंघात २०१४ मध्ये ५३.३८ टक्के इतके मतदान झाले आहे. यंदा १.६८ टक्के त्यात वृद्धी झाली आहे.
नाशिक पश्चिम मतदारसंघात गेल्यावेळी ५५.४३ टक्के मतदान झाले होते. त्यात फक्त ०.१८ टक्के इतकी वृद्धी झाली आहे. यंदा या मतदारसंघात ५५.६१ टक्के मतदान झाले आहे.
नाशिक मध्य या मतदारसंघात २०१४ मध्ये ५२.८७ टक्के इतके मतदान झाले होते. त्यात ३.०९ टक्के इतकी वाढ झाली आहे.
शहरी व निमशहरी भागातील मताधिक्यही तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे. शहरी भागातील मतदान निर्णायक ठरत असला तरी तशी स्थिती यंदा नाही. ग्रामीण भागातील मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडलेले दिसत आहेत. त्यामुळे ग्रामीण भाग हा सत्ताधिकारी पक्षाला कितपत फायदेशीर ठरेल किंवा विरोधकांच्या पथ्यावर पडेल यावर सध्या काथ्याकुट सुरू आहे.
देवळाली, इगतपुरीत घट
नाशिक लोकसभा मतदारसंघात
नाशिक शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी वाढत असली तरी देवळालीत मात्र गत वेळेच्या तुलनेत ३.०२ टक्के, तर इगतपुरीत १.३२ टक्के इतकी घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरी भागात झालेले मतदान
विधानसभा एकूण मतदान टक्के
मतदार
नाशिक पूर्व ३,५२,५५४ १,९४,१२० ५५.०६
नाशिक (प.) ३,९०,३८६ २,१७,१०१ ५५.६१
नाशिक मध्य ३,१५,८८७ १,७६,७८० ५५.९६
सिन्नर २,९९,०७४ १,९४,३१६ ६१.८८
देवळाली २,६३,७०८ १,६०,१५० ६०.७३
इगतपुरी २,६०,४४२ १,७६,०४९ ६७.६०
एकूण १८८२०५१ १११८५१६ ५९.४३