सोसायटीच्या दुकानावर अधिक भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 05:05 PM2019-03-14T17:05:31+5:302019-03-14T17:06:42+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील पिंपळगाव बसवंत विविध कार्यकारी सोसायटीच्या रेशन दुकानावर कामाचा अधिक भार येत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या संदर्भात लवकरच निर्णय घेऊ अशी माहिती पंचायत समिती सदस्य राजेश पाटील यांनी दिली.

पिंपळगाव बसवंत येथील विविध कार्यकारी सोसायटीमध्ये सध्या १ व ४ या दुकानांचे रेशनकार्ड जोडले गेले आहे. त्यातच बेहेड या गावाचेही रेशन कार्ड जोडले गेल्याने या रेशन दुकानावर सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत गर्दी असते. बेहेड येथील सप्तशृंंगी स्वस्त धान्य दुकान बंद झाले आहे. या दुकानवर प्रमाणापेक्षा जास्त ताण येत असल्याने सकाळी नऊ ते सायंकाळी सात ते आठ वाजेपर्यंत गर्दी संपता संपत नसल्याने नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते. पंचायत समिती सदस्य राजेश पाटील यांनी याबाबतीत सदर दुकानला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली असता सदर दुकानावर प्रमाणापेक्षा जास्त भार येत असल्याचे दिसून आले. काही दिवसातच बेहेड गावासाठी स्वतंत्र रेशन दुकानाबाबत पाठपुरावा करून त्यांना स्वतंत्र दुकानाची व्यवस्था करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (14 पिंपळगाव रेशन)