महापालिकेच्या सफाई कर्मचायांची पहाटे सेल्फी हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 01:51 AM2018-03-01T01:51:27+5:302018-03-01T01:51:27+5:30

महापालिकेच्या ४७८ सफाई कर्मचाºयांच्या बदल्या केल्यानंतर आरोग्य विभागाने आता सफाई कर्मचाºयांना पहाटे पाच वाजताच हजेरी शेडवर सेल्फी हजेरी बंधनकारक केली आहे. त्यामुळे उशिराने हजेरी लावणाºया कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेसह सफाई कामगारांच्या संघटनांनी सेल्फी हजेरीस विरोध दर्शविला आहे.

 The morning of cleaning workers of the municipality's cleanliness attendance selfie | महापालिकेच्या सफाई कर्मचायांची पहाटे सेल्फी हजेरी

महापालिकेच्या सफाई कर्मचायांची पहाटे सेल्फी हजेरी

Next

नाशिक : महापालिकेच्या ४७८ सफाई कर्मचाºयांच्या बदल्या केल्यानंतर आरोग्य विभागाने आता सफाई कर्मचाºयांना पहाटे पाच वाजताच हजेरी शेडवर सेल्फी हजेरी बंधनकारक केली आहे. त्यामुळे उशिराने हजेरी लावणाºया कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेसह सफाई कामगारांच्या संघटनांनी सेल्फी हजेरीस विरोध दर्शविला आहे. महापालिका आयुक्तांनी सहाही विभागांत सफाई कामकाजाचे समान वाटप व्हावे यासाठी मागील आठवड्यात ४७८ सफाई कर्मचाºयांच्या बदल्या केल्या आहेत. याशिवाय अन्य विभागात काम करणाºया ३८९ सफाई कर्मचाºयांच्या हाती पुन्हा झाडू सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सफाई कर्मचाºयांकडून विरोध होत असतानाच आरोग्य विभागाने आता कामावर उशिराने येणाºया सफाई कर्मचाºयांना दणका दिला आहे. गुुरुवार (दि. १) पासून सफाई कर्मचाºयांची पहाटे पाच वाजताच हजेरी शेडवर सेल्फी हजेरी घेण्याचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत.
कर्मचारी संघटनांचा विरोध
म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेना, सफाई कर्मचारी संघर्ष समिती, अखिल भारतीय श्री बाल्मीकी नवयुवक संघ यांच्या पदाधिकाºयांची एकत्रित बैठक होऊन सेल्फी हजेरीस विरोध दर्शविला आहे. सिंहस्थ काळात सफाई कामगारांच्या कामाची नोंद युनेस्कोने घेतलेली आहे. त्याच कामगारांवर अविश्वास दाखवून सेल्फी हजेरीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बºयाच महिला सफाई कामगार तसेच अपंग, आजारी कर्मचाºयांना पहाटे कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पुरेशी वाहतूक व्यवस्था नाही. त्यामुळे पहाटे पाच वाजता घेण्यात येणारी हजेरी पद्धत बंद करण्याची मागणी कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी प्रवीण तिदमे, सुरेश मारू, सुरेश दलोड, अनिल बहोत, सतीश टाक, सोनू कागडा यांनी केली आहे.
हजेरीसाठी टॅब वितरित
महापालिकेत यापूर्वी डॉ. प्रवीण गेडाम यांनी बायोमेट्रिक हजेरी पद्धत लागू करतानाच
सफाई कर्मचाºयांसाठी सेल्फी हजेरी बंधनकारक केली होती. परंतु सफाई कामगारांच्या संघटनांनी हा प्रयोग हाणून पाडला होता. सहाही विभागांतील स्वच्छता निरीक्षकांना सेल्फी हजेरीसाठी टॅब देण्यात आले असून, त्यांनी पहाटे ५ वाजताच कर्मचाºयांची हजेरी घेणे बंधनकारक केले आहे.

Web Title:  The morning of cleaning workers of the municipality's cleanliness attendance selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.