पहाटे, रात्री थंडीचा कडाका कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:41 AM2019-01-05T00:41:34+5:302019-01-05T00:41:54+5:30
मागील चार दिवसांपासून किमान तापमानाचा पारा वर सरकण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप पारा दहा अंशांच्या खाली स्थिरावत असल्यामुळे पहाटे व रात्री नाशिककरांना थंडीचा कडाका जाणवत आहे.
नाशिक : मागील चार दिवसांपासून किमान तापमानाचा पारा वर सरकण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप पारा दहा अंशांच्या खाली स्थिरावत असल्यामुळे पहाटे व रात्री नाशिककरांना थंडीचा कडाका जाणवत आहे. कमाल तापमान मात्र २५ अंशांवरून तिशीपार सरकल्याने सूर्योदय होताच थंडीपासून नागरिकांना दिवसभर काहीसा दिलासा मिळत आहे.
पंधरवड्यापासून शहरात थंडीची तीव्रता कमालीची वाढली आहे. यावर्षी हंगामातील किमान तापमान नीचांकी ५.१ अंशांपर्यंत खाली आले होते. तसेच कमाल तापमान देखील २३ अंशांपर्यंत घसरले होते. यामुळे थंडीचा कडाका वाढला होता. सध्या थंडीची तीव्रता कमी झाली असली तरी पहाटे तसेच रात्री थंडी नागरिकांना अनुभवयास येत आहे. पारा सध्या दहा अंशांच्या खाली असल्यामुळे वातावरणात गारठा टिकून आहे.
उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम उत्तर महाराष्टÑातील वातावरणावर होत असून, त्यामुळे नाशिकचे किमान तापमान घसरले आहे. सकाळच्या सुमारास थंडी जाणवत असल्याने जॉगिंग ट्रॅक, जिममध्ये जाणाºयांची संख्या कमी झाली आहे.
काही दिवसांपूर्वी शहरात वाहणाºया थंड वाºयाचा वेग ताशी दहा किलोमीटर असा होता; मात्र दोन दिवसांपासून वाºयाचा वेग मंदावल्याने कमाल तापमान वाढू लागले आहे. प्रखर सूर्यप्रकाशामुळे दिवसभर वातावरणात उष्मा वाढू लागला आहे. त्यामुळे नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील आठवडा दिवसभर उबदार कपडे परिधान करणाºया नाशिककरांकडून सध्या सकाळ-संध्याकाळ उबदार कपडे वापरण्यास प्राधान्य देत आहेत. यंदा डिसेंबरअखेर थंडीचा प्रचंड कडाका नागरिकांना अनुभवयास आल्याने नागरिक त्रस्त झाले होते. गेल्या आठवड्यात नाशिक हे राज्यातील सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नोंदविले गेले होते. शहरात नीचांकी ५ अंशांपर्यंत पारा घसरला होता.
—इन्फो—
रविवारपासून पुन्हा थंडीची लाट
पंधरवड्यापासून थंडीच्या लाटेचा सामना करणाºया उत्तर महाराष्टÑातील विशेषत: नाशिककरांना दोन दिवसांपासून थंडीच्या क डाक्यापासून अंशत: दिलासा मिळाला आहे; मात्र रविवारपासून सोमवारपर्यंत दोन दिवस थंडीची लाट उत्तर व मध्य महाराष्टÑात येणार असल्याचा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेने दिला आहे. काश्मीर खोºयात शुक्रवारपासून सलग बर्फवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.