शहरातील रस्त्यांवर सकाळी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:15 AM2021-05-18T04:15:30+5:302021-05-18T04:15:30+5:30
ज्येष्ठ नागरिकांचे वॉक सुरूच नाशिक : ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडण्याचे टाळावे तसेच सकाळी फिरण्यासाठीदेखील घराबाहेर पडू नये, असे ...
ज्येष्ठ नागरिकांचे वॉक सुरूच
नाशिक : ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडण्याचे टाळावे तसेच सकाळी फिरण्यासाठीदेखील घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाचे आदेश असतानाही सकाळच्या सुमारास फिरणाऱ्यांची संख्या कायम असल्याचे दिसते. गोल्फ क्लब मैदान परिसरातच मोठी गर्दी होत आहे.
किराणा दुकानदारांकडून होतेय उल्लंघन
नाशिक : अत्यावश्यक सेवावगळता सर्वप्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे. मात्र मागच्या दाराने किराणा दुकानदार सामानाची विक्री करीत असल्याचे अनेक प्रकार शहर परिसरात घडत आहेत. घरपोच सेवा देण्याची व्यवस्था असतानाही दुकानदार नियमांचा भंग करीत आहेत.
जेलरोडला गॅस पाइपलाइनसाठी खोदकाम
नाशिक : गॅस पाइपलाइनसाठी जेलरोड येथील रस्त्यांचे खोदकाम सुरू असल्याने वाहतूक विरुद्ध दिशेने वळविण्यात आली आहे. जेलरोड पाण्याची टाकी ते सैलानी बाबा चौकदरम्यान गॅस पाइपलाइनसाठी खोदकाम केले जात आहे. खोदलेला रस्ता केवळ मुरूम टाकून बुजविण्यात येत असून, त्यावर डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.
ढगाळ वातावरणामुळे आरोग्याची तक्रार
नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने ज्येष्ठ नागरिकांना या वातावरणाचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे काहीसी चिंता निर्माण झाली आहे. ज्या जेष्ठांना दम्याचा त्रास आहे अशा नागरिकांच्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.