बिबट्याच्या भीतीने मॉर्निंग वॉक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:43 AM2019-01-28T00:43:41+5:302019-01-28T00:44:01+5:30

बिबट्याचा मुक्तसंचार डावा कालवा परिसरात वाढल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. डाव्या कालव्यावरच नव्हे तर बिबट्याने थेट जुना गंगापूर नाका, रामवाडी, कोशिरे मळा या भागात नागरिकांना दर्शन दिले.

 Morning Walk Closing | बिबट्याच्या भीतीने मॉर्निंग वॉक बंद

बिबट्याच्या भीतीने मॉर्निंग वॉक बंद

Next

नाशिक : बिबट्याचा मुक्तसंचार डावा कालवा परिसरात वाढल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. डाव्या कालव्यावरच नव्हे तर बिबट्याने थेट जुना गंगापूर नाका, रामवाडी, कोशिरे मळा या भागात नागरिकांना दर्शन दिले. शुक्रवारी (दि.२५) बिबट्या चक्क गंगापूररोडवरील सावरकरनगमध्ये शिरल्यामुळे नागरिकांची पाचावर धारण बसली. या भागातील नागरिकांनी सकाळी निर्जन रस्त्यांवर ‘मॉर्निंग वॉक’ला जाणे बंद केले आहे.
सावरकरनगर, शारदानगर, शंकरनगर या उच्चभ्रू लोकवस्तीत शुक्रवारी पाहुणा आलेला बिबट्या शेकडो बघ्यांच्या गर्दीमुळे चांगलाच बिथरला. या पाहुण्याला लाठ्या-काठ्यांचा ‘प्रसाद’ही मिळाला. तीन तास चाललेल्या या धावपळीत तो चांगलाच दमला अखेर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद केले. खरे तर लोकांसोबत त्यानेही जेरबंद झाल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला असावा अन् आपण जागा चुकल्याची जाणीव पिंजºयात त्यालाही झाली असावी. बिबट्या जेरबंद झाला असला तरी त्याची दहशत या परिसरात अद्यापही कायम आहे. दोन दिवस उलटूनदेखील सूर्योदय होताच फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणाºयांची संख्या रोडावल्याचे चित्र आहे.
...तर मानव-बिबट संघर्ष टळेल
बिबट्याचा संचार अद्यापही या भागात असू शकतो या भीतीने नागरिक सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ला जाणे टाळताना दिसून येत आहे. ‘मॉर्निंग वॉक’ला जाताना नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. कारण बिबट्या रात्री भक्ष्याच्या शोधात बाहेर पडलेला असतो आणि पहाटेच्या वेळी दिवस उजडताच तो नैसर्गिक अधिवासात सुरक्षित जाण्याचा प्रयत्नात असतो. त्यामुळे सकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान त्याची हालचाल नजरेस पडण्याची शक्यता असते, अशावेळी नागरिकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करीत कुठलाही गोंगाट न करता सुरक्षितरीत्या निघून गेल्यास बिबट-मानव संघर्ष सहज टाळता येऊ शकतो.
ज्येष्ठांमध्ये अधिक
भीतीचे वातावरण
सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणाºयांमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिलांची संख्या अधिक असते. लोकवस्तीत थेट बिबट्या आल्याने नागरिकांमध्ये घबराहट कायम आहे. यामुळे सकाळच्या सुमारास गोदाकाठालगत चोपडा लॉन्स ते हनुमानवाडी रस्ता, आकाशवाणी टॉवर, पंपिंग स्टेशनरोड, होरायझन शाळा दत्तमंदिरमार्गे मखमलाबाद रस्ता, चांदशी, आनंदवल्लीकडे जाणारा गोदापार्कचा रस्ता या भागात फेरफटका मारणाºयांची संख्या कमी झाली आहे. बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे या भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे सावट कायम आहे.

Web Title:  Morning Walk Closing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.