रस्त्यावरील मॉर्निंग वॉक ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 12:10 AM2021-02-05T00:10:43+5:302021-02-05T00:11:49+5:30

नाशिक : वर्दळीच्या रस्त्यावर, महामार्गावर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांच्या जिवावर बेतल्याच्या दोन घटना गेल्या चार दिवसांत घडल्याने मॉर्निंग वॉक नेमका कुठे करावा, याविषयीच्या चर्चेला तोंड फुटले आहे. वाहतुकीच्या रस्त्यांवरील मॉर्निंग वॉक हा चुकीचाच असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Morning walk on the road is fatal | रस्त्यावरील मॉर्निंग वॉक ठरतोय जीवघेणा

रस्त्यावरील मॉर्निंग वॉक ठरतोय जीवघेणा

Next
ठळक मुद्देअपघाताच्या घटना : व्यायामासाठी सुरक्षित जागेला द्या प्राधान्य

नाशिक : वर्दळीच्या रस्त्यावर, महामार्गावर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांच्या जिवावर बेतल्याच्या दोन घटना गेल्या चार दिवसांत घडल्याने मॉर्निंग वॉक नेमका कुठे करावा, याविषयीच्या चर्चेला तोंड फुटले आहे. वाहतुकीच्या रस्त्यांवरील मॉर्निंग वॉक हा चुकीचाच असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

गेल्या सप्ताहात पिंपळगाव बसवंतजवळ मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या तिघांना अज्ञात बसचालकाने जोरदार ठोकर दिल्याने त्यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पिंपळगाव शहरातील वैभव, राकेश, सोमनाथ हे दररोजप्रमाणे शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकवर निघाले असता, रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून येणाऱ्या अज्ञात बसचालकाने बेदरकारपणे बस चालवित पाठीमागून तिघांना जोराची धडक मारली होती. त्यात जखमी अवस्थेत असणाऱ्या दोघांना दवाखान्यात न नेता, बसचालक बस घेऊन फरार झाला होता. या अपघातात परिसरातील शिवाजीनगर कोळीवाडा येथे राहणाऱ्या वैभव दायमा या युवका मृत्यू झाला, तर राकेश वाघाले गंभीर जखमी होऊन सोमनाथ गायकवाड हा थोडक्यात बचावला होता.

दुसरी घटना गुरुवारी (दि.४) पहाटे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सामनेर या गावात घडली आहे. मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन महिलांना मागून आलेल्या चारचाकी वाहनाने चिरडल्याची भीषण घटना घडली. त्यात मनीषा साहेबराव पाटील व अनिता सहादू पाटील या दोन महिला ठार झाल्या. या घटनांमुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांच्या सुरतक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मॉर्निंग वॉक साठी शहरी तसेच ग्रामीण भागातही वर्दळीच्या रस्त्यावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत असते. रस्त्यांलगतच अनेक जण व्यायामाचेही प्रकारही करत असतात. याचवेळी वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे वर्दळीच्या रस्त्यांवरील मॉर्निंग वॉक हा असुरक्षित मानला जाऊ लागला आहे. त्यावर आता प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. शहरी भागात तर अनेक ठिकाणी जॉगिंग ट्रॅक उभारले असतानाही लोक रस्त्यावर येऊन मॉर्निंग वॉक करत असल्याचे दृष्य पाहायला मिळते. त्यातून अशा दुूर्दैवी अपघाताच्या घटना घडत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी मॉर्निंग वॉक हा मोकळ्या मैदानात अथवा वाहनांची वर्दळ नसलेल्या ठिकाणीच करावा, असाही एक मतप्रवाह पुढे आला आहे.

मॉर्निंग वॉक करा, पण जपून...
हल्ली डॉक्टरांकडून चालण्याच्या व्यायामाचा सल्ला दिला जातो. याशिवाय, प्रत्येक जण आपला फिटनेस सांभाळण्यासाठीही पहाटेच्या वेळी शुद्ध हवेत मॉर्निंग वॉकला प्राधान्य देतो. अनेकजण तर केवळ फॅशन म्हणूनही या मॉर्निंग वॉककडे बघतात. भर रस्त्यांवर मॉर्निंग वॉक होत असताना ये-जा करणाऱ्या वाहनांच्या प्रदूषणाचाही त्रास लोकांना होत असतो. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी सुरक्षित जागेला प्राधान्य देणे क्रमप्राप्त ठरते.

Web Title: Morning walk on the road is fatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.