मविप्र रुग्णालयात मृत्यूपेक्षा कोरोनामुक्तचे प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:16 AM2021-03-17T04:16:03+5:302021-03-17T04:16:03+5:30

नाशिकमध्ये कोरोनाकाळात गोरगरीब रुग्णांना आडगाव येथील डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय हे अत्यंत उपयुक्त ठरले आहे. गेल्यावर्षी मार्च ...

Mortality rate in MVP hospital is higher than death rate | मविप्र रुग्णालयात मृत्यूपेक्षा कोरोनामुक्तचे प्रमाण अधिक

मविप्र रुग्णालयात मृत्यूपेक्षा कोरोनामुक्तचे प्रमाण अधिक

Next

नाशिकमध्ये कोरोनाकाळात गोरगरीब रुग्णांना आडगाव येथील डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय हे अत्यंत उपयुक्त ठरले आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात शासकीय रुग्णालयाच्या सेवा अपुऱ्या पडत असताना या रुग्णालयाचा मोठा आधार मिळाला आहे. या रुग्णालयात आत्तापर्यंत दोन हजार ६५० कोरोनाबाधित दाखल झाले होते. त्यातील ३४६ रुग्णांचा मृत्यू झाला म्हणजेच त्याचा मृत्युदर सुमारे १३ टक्के इतका आहे. अर्थात, रुग्णालयात दोन हजार ३०४ रुग्ण बरेदेखील झाले आहेत.

मुळात या रुग्णालयात क्रिटिकल म्हणजेच गंभीर अवस्थेत रुग्ण दाखल करण्याची सोय करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून या ठिकाणी रुग्ण दाखल हाेतात. यात बहुतांशी ग्रामीण भागातील प्राथमिक आराेग्य केंद्रात किंवा अन्य शासकीय रुग्णालयांतून उपचारासाठी पाठवले जातात. त्यानंतरदेखील बहुतांश रुग्णांचा एचआरसीटी स्कोर खूपच अधिक असतो, अशा स्थितीत उपचार केले जातात. याशिवाय रुग्णालयात पाठवले जाणारे कोरोनाबाधित हे अगोदरच व्याधिग्रस्त (कोमार्बिड) असतात. म्हणजेच हृदयराेग, मूत्रपिंड विकार, मधुमेह, रक्तदाब यासारख्या आजारांनी ग्रस्त असल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग अधिक गतीने झालेला असतो. त्यामुळेदेखील अशा रुग्णांच्या जीविताला अगोदरच धोका निर्माण झालेला असतो.

या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची काळजी घेतली जातेच, शिवाय कोरोनाकाळात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, रेमडिसीवरचे पुरेसे इंजेक्शन या सर्वांचीच व्यवस्था केली जाते. कुशल वैद्यकीय वर्गदेखील उपस्थित असतो. त्यामुळे रुग्णालयाकडून जास्तीत जास्त कोरोनाबाधित बरे होणाऱ्यावरच भर दिला जात असल्याचेदेखील अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोनाकाळात मृत्यू झालेल्या प्रत्येक रुग्णाचे डेथ ऑडिट करून पुढील रुग्णावर आणखी कसे उपचार करून त्याला कोरोनामुक्त करता येईल या दृष्टीने कृती ठरवली जाते, असेही अधिकाऱ्यांनी सांंगितले.

Web Title: Mortality rate in MVP hospital is higher than death rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.