सायगावी लोकवर्गणीतून साकारणार मशीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:10 AM2021-06-28T04:10:59+5:302021-06-28T04:10:59+5:30

जुनी मशीद पाडून त्या जागेवर नवीन बांधकाम व्हावे, ही गावातील मुस्लीम बांधवांची मागणी होती. त्यानुसार मुस्लीम ...

A mosque to be built by Saigavi people | सायगावी लोकवर्गणीतून साकारणार मशीद

सायगावी लोकवर्गणीतून साकारणार मशीद

googlenewsNext

जुनी मशीद पाडून त्या जागेवर नवीन बांधकाम व्हावे, ही गावातील मुस्लीम बांधवांची मागणी होती. त्यानुसार मुस्लीम बांधव व ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने भूमिपूजन झाले असून लवकरात लवकर नवीन मशिदीची वास्तू आकाराला येईल, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

मशिदीसाठी ज्यांना शक्य होईल ते आर्थिक मदत करतील, ज्यांना शक्य ते अंगमेहनत करून यथाशक्ती मदत करतील असे युवकांनी यावेळी मत व्यक्त केले. यावेळी काजी अहमदभाई यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करून नमाज पठण केले. याप्रसंगी सायगाव सोसायटीचे अध्यक्ष विजय खैरनार, एन्झोकेम महाविद्यालयाचे संचालक रघुनाथ खैरनार, मुस्लीम कमिटीचे अध्यक्ष शाहरुख शेख, किरण भालेराव, देवीदास जानराव, मॉर्निंग ग्रुपचे विक्रम देशमुख, विजय उशीर, जनार्दन वालतुरे, बशीरभाई शेख, फरीदभाई शेख, मुफ्ती अब्दुल जमिलभाई, आसिफ भाई, मौलाना सुभान समदभाई, रजाक शेख, राजूभाई शेख, कडूभाई शेख, फिरोज शेख, समीर शेख, अमजद शेख, बबनभाई शेख, बबलू शेख, मुनिर शेख आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो - २६ सायगाव मशीद

सायगाव येथे नूतन मशिदीच्या वास्तूचे भूमिपूजन करताना ग्रामस्थ.

===Photopath===

260621\563026nsk_40_26062021_13.jpg

===Caption===

फोटो - २६ सायगाव मशिदसायगाव येथे नूतन मशिदीच्या वास्तूचे भूमिपूजन करताना ग्रामस्थ. 

Web Title: A mosque to be built by Saigavi people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.