पंचवटी परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला

By admin | Published: July 21, 2016 10:32 PM2016-07-21T22:32:59+5:302016-07-21T22:33:45+5:30

नागरिक त्रस्त : महापालिकेचे दुर्लक्ष

The mosquito infestation in the Panchavati area increased | पंचवटी परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला

पंचवटी परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला

Next

पंचवटी : दोन-तीन दिवस झालेल्या पावसाने उघडीप दिल्यानंतर परिसरात पुन्हा डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने पंचवटीकर त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढलेला असला तरी त्याकडे महापालिकेच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
डासांमुळे नागरिकांना सायंकाळच्या वेळी दारे खिडक्या बंद करून बसावे लागते, तर रात्रीच्या वेळी डासांचा चावा वाचविण्यासाठी मच्छरदाणी तसेच कछवा छाप अगरबत्त्यांचा वापर करावा लागत आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने औषध फवारणी केली जात असली तरी ही औषध फवारणी ठराविक भागातच केली जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. लोकप्रतिनिधी तसेच त्यांचे कार्यकर्ते राहत असलेल्या परिसरातच औषध फवारणीचे काम प्राधान्याने केले जाते तर, मग सर्वसामान्य नागरिक राहत असलेल्या परिसरात औषध फवारणी का नाही, असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.
डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने पंचवटीत पुन्हा मलेरिया, डेंग्यू यांसारखे आजार उद््भवण्याची दाट शक्यता असल्याने महापालिकेच्या संबंधित विभागाने डासनिर्मूलन मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: The mosquito infestation in the Panchavati area increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.