जिल्ह्यात सर्वाधिक २७७९ कोरोनाबाधित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 02:39 AM2021-03-23T02:39:47+5:302021-03-23T02:42:08+5:30

जिल्ह्यात कोरोनाने सोमवारी नवीन उच्चांक स्थापित करत तब्बल २७७९ पर्यंत मजल मारली. सोमवारी (दि. २२) दिवसभरात बाधित संख्येने पुन्हा अडीच हजाराचा टप्पा ओलांडला असून नाशिक महापालिका क्षेत्रातील १,५४४ रुग्णांचा समावेश आहे. त्यात पाच महिन्यांनंतर बळींची संख्या-देखील दिवसभरात १२ वर गेल्याने यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे.

Most 2779 corona affected in the district! | जिल्ह्यात सर्वाधिक २७७९ कोरोनाबाधित!

जिल्ह्यात सर्वाधिक २७७९ कोरोनाबाधित!

Next
ठळक मुद्देदाटले भय : आतापर्यंत जास्त रुग्णांसह १२ बळी

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने सोमवारी नवीन उच्चांक स्थापित करत तब्बल २७७९ पर्यंत मजल मारली. सोमवारी (दि. २२) दिवसभरात बाधित संख्येने पुन्हा अडीच हजाराचा टप्पा ओलांडला असून नाशिक महापालिका क्षेत्रातील १,५४४ रुग्णांचा समावेश आहे. त्यात पाच महिन्यांनंतर बळींची संख्या-देखील दिवसभरात १२ वर गेल्याने यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे.
जिल्ह्यात सोमवारी तब्बल २,७७९ बाधित रुग्ण तर २,६९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ३, ग्रामीणला ९ असे एकूण १२ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २,२३२ वर पोहोचली आहे. गत आठवडाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने २ हजार आणि अडीच हजारावर राहिल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
बळीतील वाढीने चिंता 
कोरोना रुग्ण वाढीइतकीच किंबहुना त्यापेक्षाही अधिक गंभीर बाब म्हणजे कोरोना बळींची संख्या सलग दुसऱ्या दिवशी दोन आकडी राहिली आहे. यापूर्वी कोरोनाबळी दहावर राहण्याचे प्रमाण कोरोनाच्या बहराच्या काळात म्हणजे सप्टेंबरमध्येच होते. रविवारी १० तर सोमवारी १२ बळी गेल्याने ही बळींची वाढती संख्या हा अधिक चिंतेचा विषय ठरत आहे.
प्रलंबित अहवाल ४,०४६ 
जिल्ह्यात संशयितांची तपासणी आणि नमुने गोळा होण्याच्या प्रमाणात आठवडाभरात प्रचंड वेगाने वाढ होत आहे. त्यामुळेच प्रलंबित अहवालाची संख्या वाढत असून सोमवारी ही संख्या ४,०४६ वर पोहोचली आहे. 
नाशिक महापालिका क्षेत्रात १,५४४ रुग्ण
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा सर्वाधिक १,५४४ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. मनपा क्षेत्रात आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असताना आणि नागरिक जागरूक असतानाही कोरोनाबाधितांच्या वेगाने मनपाचा आरोग्य विभागदेखील चक्रावून गेला आहे.
 

Web Title: Most 2779 corona affected in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.