औद्योगिक वसाहतीत सर्वाधिक उमेदवार

By admin | Published: November 17, 2016 11:28 PM2016-11-17T23:28:05+5:302016-11-17T23:35:16+5:30

औद्योगिक वसाहतीत सर्वाधिक उमेदवार

Most candidates in industrial colonies | औद्योगिक वसाहतीत सर्वाधिक उमेदवार

औद्योगिक वसाहतीत सर्वाधिक उमेदवार

Next

सिन्नर : उपनगरांमध्ये वास्तव्यास असलेल्या व औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या कष्टकरी कामगारांच्या प्रभाग ११ ब मध्ये कामगार नेत्यांमध्येच वर्चस्वासाठी बहुरंगी लढत होत असल्याचे चित्र आहे. सर्वसाधारण जागेसाठी या प्रभागात शहरातील सर्वाधिक उमेदवार रिंगणात आहेत. जवळपास सर्वच पक्षांचे उमेदवार या प्रभागात आपले नशीब आजमावत आहेत.
प्रभाग ११ ब च्या सर्वसाधारण जागेसाठी शिवसेना, भाजपा, कॉँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे व दोन अपक्ष असे सर्वसाधारण जागेसाठी शहरातील सर्वाधिक म्हणजे सात उमेदवार रिंगणात असल्याने लढत बहुरंगी होत आहे. या प्रभागाचे वैशिष्ट्य म्हणजे पालिका निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आघाडी असताना प्रभाग ११ ब मध्ये कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. शिवसेनेने सोमनाथ पावसे, भाजपाने अनिल कर्पे, कॉँग्रेसने त्र्यंबक सोनवणे, राष्ट्रवादी कॉँग्रेसने वैभव ठाणेकर, मनसेने मंगल दीपक आरोटे यांना उमेदवारी दिली आहे, तर अनिल सरवार आणि मारुती कनकुटे हे अपक्ष उमेदवार पक्षीय उमेदवारांचा सामना करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे, सर्वसाधारण जागेसाठी होत असलेल्या या प्रभागातील निवडणुकीतील सर्व उमेदवार नवखे आहेत. या सर्वांनी यापूर्वी कधीही नगरपालिका निवडणूक लढवली नाही. नव्या दमाच्या या उमेदवारांमध्ये मोठा उत्साह असून, या बहुरंगी लढतीकडे सिन्नरकरांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. बहुतांश उमेदवार कामगार प्रतिनिधी असून, त्यामुळे त्यांच्यात नेतृत्वगुण अंगी ठासून भरले असल्याने त्यांच्यात चुरस आहे.
शिवसेनेचे उमेदवार सोमनाथ पावसे आमदार राजाभाऊ वाजे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. संजीवनीनगर भागात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उभारणी, गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा दरवर्षी गुणगौरव, उपनगरांमध्ये स्वखर्चातून अनेक विकासकामे, मोफत आरोग्य शिबिरे, महिलांसाठी रोजगार निर्मिती, उन्हाळ्यात स्वत:च्या टॅँकरद्वारे मोफत पाणीवाटप आदिंसह विविध सामाजिक उपक्रमात पावसे अग्रभागी राहिले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Most candidates in industrial colonies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.