बहुतांशी उमेदवार कर्जबाजारी

By admin | Published: February 16, 2017 01:21 AM2017-02-16T01:21:40+5:302017-02-16T01:22:24+5:30

सातपूर विभाग : उमेदवारांची सांपत्तिक स्थिती जाहीर

Most candidates will be lenders | बहुतांशी उमेदवार कर्जबाजारी

बहुतांशी उमेदवार कर्जबाजारी

Next

 सातपूर : महानगरपालिका निवडणुकीत निवडणूक लढविणारे बहुतांश उमेदवार लखपती तर बरेच कोट्यधीश आहेत. यातील बऱ्याच उमेदवारांवर वित्तीय संस्थांचे कर्ज आहे. या उमेदवारांनी स्वत: प्रतिज्ञापत्राद्वारे संपत्ती घोषित केली आहे. असे असले तरी काही उमेदवार अगदीच गरीबदेखील आहेत.
गेले दहा वर्षे नगरसेवक पद भूषिवणारे दिनकर पाटील हे कोट्यधीश आहेत. सुमारे २ लाख रुपये रोख, २२ लाख रु पयांच्या ठेवी, जवळपास ३७ लाखांची मोटार, दीड लाख रुपयांचे दागिने असे ६३ लाख ७६ हजार रुपये, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १० लाख ७८ हजार रु पये, जंगम मालमत्ता ७७ लाख ५० हजार रु पये, स्थावर मालमत्ता ८४ लाख ४९ हजार रुपये, अशी ९ कोटी २२ लाख रुपयांची मालमत्ता आणि ८ कोटी ४५ लाख रु पयांचा जमीनजुमला आहे. दिनकर पाटील यांच्यावर सुमारे साडेनऊ लाखांचे कर्जदेखील आहे. प्रभाग क्र मांक ८ मधून निवडणूक लढविणारे दिनकर पाटील यांचे पुत्र अमोल पाटील हेदेखील लक्षाधीश आहेत. त्यांच्याकडे सुमारे सव्वा लाख रु पये रोख, १७ हजार रु पयांच्या ठेवी, ३३ हजार रु पयांचे बंधपत्र, सुमारे १६ लाख रुपयांची मोटार, ३ लाख रुपये किमतीचे दागिने, सुमारे २२ लाख रुपयांची जंगम मालमत्ता, ३५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्यावर साडेपाच लाख रु पये वित्तीय संस्थेचे कर्ज आहे.
प्रभाग क्र . ९ मधून प्रेम दशरथ पाटील यांच्याकडे १ लाख ४३ हजार रुपये रोख, २७ लाख ३५ हजार रु पयांच्या ठेवी, तर ३ लाख ७८ हजार रु पयांचे दागदागिने आणि सुमारे ३५ लाखांची मोटार गाडी, तसेच त्यांच्या कुटुंबाकडे ४७ लाख ५५ हजार रुपयांची जंगम मालमत्ता व सुमारे ५४ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असून, त्यांच्या नावावर वित्तीय संस्थेचे साडेसात लाख रुपयांचे कर्ज आहे. प्रभाग क्र मांक ११ मधून निवडणूक लढविणारे नगरसेवक सलीम शेख यांच्याकडे रोख दीड लाख रुपये आहेत. सुमारे साडेतीन लाख रु पयांच्या ठेवी, दीड लाख रु पयांची प्रमाणपत्रे, सुमारे २५ लाखांची मोटार गाडी, ९ कोटी ९० लाख ५० हजार रु पये किमतीचा जमीनजुमला असून, त्यांच्यावर ५५ लाख रुपयांचे कर्जदेखील आहे. प्रभाग क्र मांक १० मधून निवडणूक लढविणाऱ्या डॉ. वृषाली सोनवणे यांच्याकडे ३ लाख ७८ हजार रु पये रोख, २ लाख रु पयांच्या ठेवी, ५ लाख रुपयांचे दागदागिने आहेत. (वार्ताहर)

Web Title: Most candidates will be lenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.