भरवस्तीत धोकादायक उघडे रोहित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 11:26 PM2020-01-23T23:26:15+5:302020-01-24T00:39:08+5:30
वीज वितरण कंपनीच्या देवगाव सबस्टेशनअंतर्गत असलेल्या कार्यक्षेत्रातील रोहित्रांचा बोजवारा उडाला आहे. वारंवार तक्रारी, पदाधिकारी यांनी समक्ष, फोनद्वारे केलेली कानउघडणीचाही परिणाम या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर झाल्याचे दिसून येत नाही. केवळ ग्रामीण भाग म्हणून दुर्लक्ष केले जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. उघडे रोहित्र, तुटलेल्या वीजतारा यांचा स्पर्श होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
खेडलेझुंगे : वीज वितरण कंपनीच्या देवगाव सबस्टेशनअंतर्गत असलेल्या कार्यक्षेत्रातील रोहित्रांचा बोजवारा उडाला आहे. वारंवार तक्रारी, पदाधिकारी यांनी समक्ष, फोनद्वारे केलेली कानउघडणीचाही परिणाम या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर झाल्याचे दिसून येत नाही. केवळ ग्रामीण भाग म्हणून दुर्लक्ष केले जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. उघडे रोहित्र, तुटलेल्या वीजतारा यांचा स्पर्श होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
रूई-कोळगाव रस्त्यावर खंडेराव नरहरी गवळी यांचे वस्तीवर वीज महावितरण कंपनीचे रोहित्र (डीपी) आहे. रोडलगत असलेल्या या रोहित्राची अत्यंत बिकट परिस्थितीतून वाटचाल सुरू आहे. सदरच्या रोहित्राचे खांब तिरपे झाले आहेत. हे रोहित्र उघड्या स्वरूपात आहे. त्यावरील पत्र्याच्या पेट्या गंजून सडून गेलेली आहे. त्यामुळे त्यातील सर्व जोडणी करण्यात आलेले वायरींचे जॉइंट उघडे आहेत.
फुटलेले व नादुरुस्त फ्युज त्या फ्युजमधील वाहिन्या परस्पर कनेक्शनसाठी जोडण्यात आल्या आहेत. त्यांना टेपही लावण्यात आलेला नाही किंवा विद्युतरोधक अशी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. या वस्तीवर लहान मुले, पाळीव प्राणीही आहेत. या उघड्या व धोकादायक रोहित्रांमुळे मोठा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे त्याची दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे आहे. भविष्यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी या रोहित्राची तत्काळ
दुरु स्ती करून नवीन खांब बसवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
वीज वितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचारी यांनी याबाबत सजगता दाखवून तत्काळ परिसरातील अशा धोकादायक रोहित्रांची
माहिती गोळा करून त्यांच्या दुरुस्तीबाबत वरिष्ठ कार्यालयास कळवून दुरु स्ती करणे गरजेचे आहे.
रोडलगत असलेल्या रोहित्रांची अशी दयनीय अवस्था असून, शेतातील, झाडांच्या गर्दीत असलेल्या रोहित्रांबाबत विचार न केलेला
बरा. परिसरातील एकूण रोहित्रांपैकी नादुरुस्त रोहित्रांची संख्या
नक्कीच जास्त असल्याचा अंदाज आहे.
ग्रामीण भागात वीज वितरण कंपनी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व समान्य जनता यांच्याबाबत भीत भीतच माहीती देतात.
ग्रामीण भागात बिबट्या, सर्प, रानडुकरांसारख्या श्वापदांमुळे हैराण असलेल्या ग्रामीण भागातील शेतकºयांना जाणूबुजून रात्रीची वीज उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे शेतकरीवर्ग हैराण आहे. तरी या परिसरातील शेतकºयांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी परिसरातील नादुरु स्त रोहित्र व गंजलेल्या पेट्या, तिरपे झालेले खांब, दोन खांबामधील वीजवाहिनींचा झोल व इतर समस्यांची तत्काळ वरिष्ठ स्तरावरून पाहणी करून दुरु स्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.