मक्याची सर्वाधिक पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 10:45 PM2020-06-22T22:45:41+5:302020-06-22T22:46:19+5:30
देवळा : देवळा तालुक्यात २२९९० हेक्टर (७६.०७ टक्के ) क्षेत्रावर खरिप पिकांची पेरणी झाली आहे. गतवर्षी मका पीकावर लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे यंदा मका लागवडीत घट होईल असा अंदाज वर्तिवण्यात येत होता, परंतु गतवर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी बाजरीच्या क्षेत्रात घट झाली असून आतापर्यंत मका पिकाची सर्वाधिक पेरणी तालुक्यात झाली असल्याची माहीती तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे यांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

देवळा तालुक्याची ओळख असलेला वसाका बंद पडल्यानंतर उसाची लागवड कमी होत गेली. गिरणा खोऱ्यातील उसाचे क्षेत्र कमी होऊन खरीप हंगामात घेण्यात येणाºया पीकांपेक्षा हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून मका पिकाच्या लागवडीचे क्षेत्रात दरवर्षी वाढ होत गेली. चालू वर्षी मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. चक्री वादळामुळे देवळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावल्यानंतर शेतकºयांनी खरीपाची पेरणी सुरू केली होती.
चांगल्या हंगामाची शेतकºयांना अपेक्षासध्या मेशीसह परिसरात खरिपाच्या पेरणीच्या कामांची लगबग सुरू आहे.गेल्या आठवड्यापासून चांगला पाऊस होत असल्याने यावर्षी खरीप हंगाम चांगला असेल अशी सर्व शेतकरी आशा बाळगून आहेत. तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तरीही शेतकरी मात्र पाऊस पडल्याबरोबर कामाला लागला आहे. सध्या मका, मुग, उडीद, भुईमूग, बाजरी आदी पिकांची जोरदार पेरणी सुरू झाली आहे. या वर्षी मका पिकांचे मात्र क्षेत्र वाढणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मका पिकांची पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. सध्या सगळीकडे मान्सूनचा पाऊस पडत आहे.