जिल्ह्यात सर्वाधिक जलसंधारणाची कामे सिन्नर तालुक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 05:53 PM2019-01-06T17:53:01+5:302019-01-06T17:53:13+5:30
नांदूरशिंगोटे : जिल्ह्यात झालेल्या जलसंधारणाच्या कामात सर्वाधिक काम हे सिन्नर तालुक्यात झाले आहे. यावर्षी पावसाची अवकृपा झाल्यामुळे त्याचा परिणाम दिसून आला नाही.
नांदूरशिंगोटे : जिल्ह्यात झालेल्या जलसंधारणाच्या कामात सर्वाधिक काम हे सिन्नर तालुक्यात झाले आहे. यावर्षी पावसाची अवकृपा झाल्यामुळे त्याचा परिणाम दिसून आला नाही. परंतु, हतबल न होता तालुक्यातील जलसंधारणाचे काम विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात निश्चितच पाणी साठा वाढण्यास मदत होणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावाचा चेहरामोहरा बदलत असल्याचे प्रतिपादन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले.
सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रूक येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार वाजे हे बोलत होते. आमदार वाजे व जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. ब्रम्हानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पांडूरंग केदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, शिवसेना युवा नेते उदय सांगळे, उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ भाबड, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, पंचायत समिती सदस्य शोभा बर्के, स्टाईसचे अध्यक्ष पंडीत लोंढे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष फकीरराव हिरे, शिवसेना तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, दीपक खुळे, संजय सानप, नामदेव शिंदे, सरपंच गोपाळ शेळके, आनंदराव शेळके, रघुनाथ आव्हाड, देवराम केदार, आनंदा कांगणे, राजाराम आव्हाड, दीपक बर्के यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत तालुक्यात प्रत्येक गावात बदल होताना दिसत आहे. अनेक गावांमध्ये विकासाची कामे सुरू आहे. काही ठिंकाणी विकास कामांना अडथळा आणला जात आहे. परंतु, त्यावरही मात करून त्या गावात शेवटच्या घटकापर्यंत विकास करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आमदार वाजे यांनी सांगितले. तालुक्यातील सर्वच संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे नेहमीच विकासाला पाठबळ लाभले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान तालुक्याला मिळाल्यामूळे गट व गणातील विकास कामांना जास्त प्रमाणात चालना मिळाल्याचे वाजे म्हणाले. विविध सामाजिक संस्था व जलयुक्त शिवार माध्यमातून तालुक्यात ४४ टक्के जलसंधारणाचे काम झाले आहे. आगामी काळात भोजापूर धरणातील गाळ उपसा करण्यासंदर्भात उपाययोजना केल्या जाणार असल्याचेही आमदार वाजे म्हणाले. तालुक्यात सर्वाधिक गावांमध्ये महत्वाचा असणारा स्मशानभूमी परिसर विकासासाठी जनसुविधा निधीतून सर्वाधिक कामे केली असल्याचे वाजे यांनी सांगितले. वाड्या-वस्त्यांवर नळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी कसे पोहचेल यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने पुढील पाच ते सहा महिन्यांचा काळ सर्वासाठीच अवघड असून तालुक्यातील जनतेला पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चारा यासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याचे वाजे यांनी सांगितले. कोणत्याही प्रकारे डामडौल न करता तसेच लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात सत्कार समारंभाला फाटा देत कामे करत असल्याचे वाजे यांनी सांगितले. आमदार वाजे यांच्या पाठपुराव्याने व व अध्यक्ष सांगळे यांच्या प्रयत्नातून नांदूरशिंगोटे जिल्हा परिषद गटात गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्रामस्थांच्या कामांना नेहमीच प्राधान्य दिले असल्याचे जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार यांनी प्रास्तविकात सांगितले.
यावेळी नगरसेवक गोविंद लोखंडे, जगन्नाथ भाबड, आनंदा शेळके, गणपत केदार, पांडुरंग केदार आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच रामदास चकणे, प्रकाश पांगारकर, गोटीराम सांगळे, संदीप पगार, बाबासाहेब दळवी, रामदास दराडे, दत्तू आव्हाड, एकनाथ आव्हाड, दत्तू दराडे, म्हाळू केदार, शंकर आव्हाड, बाबूराव आव्हाड, कारभारी आव्हाड, किरण कांगणे, तुकाराम आव्हाड, कैलास केदार आदींसह दोडी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट- नांदूरशिंगोटे गटातील विकास कामांचा अनुशेष भरून काढला.
गेल्या दहा वर्षांपासून नांदूरशिंगोटे जिल्हा परिषद गटात विविध विकास कामे खुंटली होती. नांदूर व दोडी भागात अल्पावधी काळात विविध विकास कामे उभी राहील्याचे उदय सांगळे यांनी सांगितले. कमीतकमी कालावधीत विकास कामांना प्राधान्य दिले आहे. या भागात होणाऱ्या विकास कामांत प्रामुख्याने रस्ते, आरोग्य, वाचनालय, अभ्यासिका, पाणी पुरवठा व जलसंधारण यांना प्राधान्य देण्यात आले. गटा-तटाचा विचार न करता सर्वांना बरोबर घेवून विकास साधला जात असल्याचे सांगळे यांनी सांगितले. गेल्या पंधरा वर्षातील कामे व साडेचार वर्षातील कामे यात मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत आहे. प्रत्येक वाडीवस्तीपर्यंत विकासाचे काम पोहचविण्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न असल्याचेही सांगळे यांनी सांगितले. तालुक्यात सुरू असलेले विकास कामांचा इतर तालुक्यांनी आदर्श घ्यावा असे काम आमदार राजाभाऊ वाजे हे करत असल्याचे सांगळे म्हणाले.
फोटो क्र.- 06२्रल्लस्रँ06
फोटो ओळी- सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रूक येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला. त्याप्रसंगी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, उदय सांगळे, नीलेश केदार, शोभा बर्के, जगन्नाथ भाबड, शैलेश नाईक, पंडीत लोंढे, संजय सानप, दीपक खुळे, नामदेव शिंदे, पांडुुरंग केदार, एकनाथ आव्हाड, दीपक बर्के, गणपत केदार आदी.